संजय राऊत यांनी सांगितले खासगी जीवनातील रहस्य - Sanjay Raut shared the secret of private life | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

संजय राऊत यांनी सांगितले खासगी जीवनातील रहस्य

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 14 नोव्हेंबर 2020

राऊत यांनी महाविकास आघाडीचे सरकार, सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण, कंगना रानौत, भाजप आणि कोरोना संसर्गासंदर्भात मनमोकळी चर्चा केली.

मुंबई : बाळासाहेबांनी मला 28 व्या वर्षी संपादक बनवलं. मी खूप कमी वयात संपादक झालो. त्यामुळे माझं कोणतंही खासगी आयुष्य नाही, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एका मुलाखतीत सांगून आपल्या खासगी जीवनाचे रहस्य उघड केले.

राऊत यांनी महाविकास आघाडीचे सरकार, सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण, कंगना रानौत, भाजप आणि कोरोना संसर्गासंदर्भात मनमोकळी चर्चा केली. 

राऊत म्हणतात, ‘`मी खूप कमी वयात संपादक झालो. त्यामुळे माझं पर्सनल आयुष्य तिथेच संपलं. मी पूर्ण वेळ माझ्या कामाला देतो. बाळासाहेबांसोबत काम करणं, ही माझ्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट आहे. मी पूर्ण आयुष्य त्यांच्यासोबत लावलं आहे. बाळासाहेबांनी मला वयाच्या 28 व्या वर्षी सामनाचा संपादक बनवलं.`’

बाळासाहेबांसोबत काम करणं, त्यांच्या विचारांना पुढे नेणं, हे त्यावेळी खूप महत्त्वाचं होतं. भूमिपुत्रांना न्याय मिळावा, यासाठी त्यांनी कायम प्रयत्न केले. प्रत्येक राज्यातील नागरिकांना सगळ्यात आधी रोजगाराचा हक्क मिळाला पाहिजे, असं त्यांचं मत होतं. मराठी माणसासाठी महाराष्ट्र आहे. देश एक असला, तरी प्रत्येक राज्याची वेगळी संस्कृती आहे. यासाठी लढलं पाहिजे, असे बाळासाहेबांचे मत असायचे, असे राऊत यांनी सांगून त्या आठवणींना उजाळा दिला.

दरम्यान, राऊत यांनी विविध मुद्द्यांना स्पर्ष करीत आपले मत व्यक्त केले. राज्यात घडलेल्या विविध प्रकरणांबाबत त्यांनी स्पष्ट भूमिका घेत वक्तव्य केले. काम कोणतेही असो, ते सचोटीने आणि पूर्ण क्षमतेने करण्यातच यश अवलंबून असते, हे त्यांच्या बोलण्यावरून स्पष्ट झाले. शिवसेनेशी एकनिष्ट राहत त्यांनी पक्षाचे मुखपत्र यशस्वीपणे चालविले. खासदार झाल्यानंतर त्यांनी केलेल्या कामांचा लेखाजोखा अप्रत्यक्षपणे मांडत शिवसेनेसाठीच आपले जीवन असल्याचे त्यांनी वारंवार स्पष्ट केले. शिवसेनाप्रमुखांविषयी असलेला आदरभार, असलेली आस्था त्यांच्या बोलण्यातून जाणवली.

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख