कोविडसेंटरसाठी 300 रुपयांची खुर्ची 600 रुपयांनी भाड्याने घेतली ! दरेकर यांच्याकडून भांडाफोड - Rent a chair for Rs. 300 for Covidcenter for Rs. 600! Disclosure from Darekar | Politics Marathi News - Sarkarnama

कोविडसेंटरसाठी 300 रुपयांची खुर्ची 600 रुपयांनी भाड्याने घेतली ! दरेकर यांच्याकडून भांडाफोड

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 4 मार्च 2021

व्हेंटीलेटर 6 लाखाचे 18 लाखाला लावले. कोविड सेंटरमध्ये लागणाऱ्या खुर्च्या भाड्याने घेताना 300 रुपये किमतीची खुर्ची 600 रुपयांनी भाड्याने घेण्यात आली.

मुंबई ः कोरोनाच्या काळात जम्बो कोविड सेंटरमध्ये अनेक बाबी घडल्या. मास्क किंमत 22 रुपये ठरलेली असताना 370 रुपये लावली. व्हेंटीलेटर 6 लाखाचे 18 लाखाला लावले. कोविड सेंटरमध्ये लागणाऱ्या खुर्च्या भाड्याने घेताना 300 रुपये किमतीची खुर्ची 600 रुपयांनी भाड्याने घेण्यात आली, असा हिशोब मांडत विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी कोरोना काळात झालेल्या गैरव्यवहाराचा पोलखोल केला.

हेही वाचा... मी मंत्री असतो तर राजीनामा दिला असता

विधानपरिषदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दरेकर भाषण करीत होते. त्यांच्या आधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषण केले. त्यांनी कोरोनाच्या काळात महाविकास आघाडी सरकारने केलेल्या कामगिरीची माहिती दिली.

शासनाने चांगले काम केल्याने कोरोना आटोक्यात आणता आला, असे पवार यांनी सांगितले होते. त्यावर उत्तर देताना दरेकर म्हणाले, की कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल झाले. सरकारी कोविड सेंटर सुरू करताना अनेक गैरव्यवहार झाले.महागाईबाबत ते म्हणाले,की एलपीजी गॅसची किंमत 2015 ला 606 होती. आता ती 719 झाली. केंद्र सरकारने राज्याला हवी ती मदत केली आहे. सध्या पेट्रोल दरवाढ होत आहे, याबाबत केंद्र सरकारही प्रयत्न करीत आहे. केंद्र सरकारकडून मिळणारा निधी चांगला आहे, असे दरेकर यांनी सांगितले.
 

हेही वाचा...

कोविड उपचार केंद्र कोपरगावात कार्यान्वित 

कोपरगाव : कोरोनाबाधित रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने महाविकास आघाडी सरकारने तालुकास्तरावर पुन्हा कोविड केअर सेंटर सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी तालुक्‍यात गुरुवारपासून (ता. चार) कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू होत असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली. 

हेही वाचा... घुलेंच्या शर्यतीत शेळकेंची एन्ट्री

तालुक्‍यातील प्रशासकीय अधिकारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोरोना नियंत्रणासाठी प्रत्यक्ष कोविड केअर आणि हेल्थ केअर केंद्राना भेट देऊन पाहणी केली. तहसीलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, पोलिस निरीक्षक दौलत जाधव व वासुदेव देसले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते, विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे, ग्रामीणचे अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर, डॉ. विजय गनबोटे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, डॉ. गायत्री कांडेकर आदी उपस्थित होते. लायन्स मूकबधिर विद्यालयातील शुक्रतीर्थ कोविड केअर सेंटरमध्ये 50 रुग्णांना उपचार व सेवा देता येईल, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख