26/11 ची आठवण ! मुख्यमंत्र्यांनी वाहिली शूरविरांना आदरांजली

मुंबईतील या हल्ल्यातपोलिस महासंचालक विजय करकरे, अतिरिक्त आयुक्त अशोक कामटे,पोलिस निरीक्षक विजय साळसकर आदी महत्त्वाच्या अधिकाऱ्यांसह अनेक पोलिस शहीद झाले होते.
thakreye.png
thakreye.png

मुंबई : 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यामध्ये अनेक पोलिस शहीद झाले. आज या दिवसाची आठवण म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शूरविरांना मुंबईतील पोलीस आयुक्तालय प्रांगणातील शहीद स्मारक येथे मानवंदना देत आदरांजली वाहिली. 

आज सकाळी मुख्यमंत्र्यांनी पुष्पचक्र अर्पण करून शहिदांना मानवंदना दिली. या दिवशी हा हल्ला परतून लावताना अनेक पोलिस अधिकारी व कर्मचारी शहीद झाले. त्यांचे स्मारक असलेल्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी आदरांजली वाहिली.

मुंबईतील या हल्ल्यात पोलिस महासंचालक विजय करकरे, अतिरिक्त आयुक्त अशोक कामटे, पोलिस निरीक्षक विजय साळसकर आदी महत्त्वाच्या अधिकाऱ्यांसह पोलिस निरीक्षक शशांक शिंदे, उपनिरीक्षक प्रकाश मोरे, बाबुराव धरगुडे आदींसह अनेक पोलिस शहीद झाले होते.

26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई शहरावर 10 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भीषण हल्ला केला होता. 26 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर दरम्यान पोलिस व अतिरेक्यांत मोठी चकमक सुरू होती. यामध्ये 34 परदेशी नागरिकांसह 197 जण ठार झाले होते. त्यामध्ये पोलिस अधिकारी व कर्मचारीही ठार झाले. 800 पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते. 29 नोव्हेंबरला हा हल्ला पूर्णपणे परतून लावण्यात यश आले होते.

मुंबईतील हाॅटेल ओबेराॅय ट्रायडेंट हाॅटेलमध्ये गोळीबार व बाॅम्बस्फोट झाला होता. ताज महाल हाॅटेलमध्ये गोळीबार होऊन 6 बाॅम्बस्फोट झाले. त्यामुळे आग लागून अनेकांना अतिरेक्यांनी ओलिस ठेवले होते. मादाम कासा इस्पितळात गोळीबार होऊन अनेक नागरिकांना ओलिस ठेवण्यात आले. 

यामध्ये आठ हल्ले दक्षिण मुंबईत झाले. त्यामध्ये छत्रपती शिवाजी टर्मिनस, लियोपोल्ड कॅफे, कामा हाॅस्पिटल, नरीमन हाऊस आदी ठिकाणांचा समावेश होता. या वेळी अजमल अमीर कसाब या अतिरेक्याला पोलिसांनी 26 नोव्हेंबरला ताब्यात घेतले. या हल्ल्यामागे लष्करे तोयबा या दहशतवादी संघटनेचा हात होता.

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com