बलात्काऱ्यांना नपुसक बनविण्याची शिक्षा ! पाकिस्तानचा नवा कायदा

याबाबत पाकिस्तानच्या राष्ट्रपती भवनातर्फे एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार लैंगिक गुन्ह्याच्या प्रकरणामध्ये त्वरीत ट्रायलसाठी देशभरात विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात येणार आहे.
rape.png
rape.png

मुंबई : देशातील बलात्काराला आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असताना आता नपुसक बनविण्याचा कठोर कायदा पाकिस्तानमध्ये करण्यात आला आहे. या आगळ्या वेगळ्या शिक्षेमुळे या घटना थांबतील, असे सांगितले जात असून, या कायद्याचे पाकिस्तानमध्ये स्वागतही झाले आहे.

या नवीन कायद्यानुसार बलात्कार प्रकरणाची लवकरात लवकर चाैकशी होऊन त्यावर सुनावणी केली जाणार आहे. दोषी आढळलेल्या व्यक्तीला नपुसक करण्याची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे. काल या नवीन कायद्याबाबत पाकिस्तानच्या राष्ट्रपतींन स्वाक्षरी केल्याचे एका वृत्त वाहिनीने म्हटेल आहे.

याबाबत पाकिस्तानच्या राष्ट्रपती भवनातर्फे एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार लैंगिक गुन्ह्याच्या प्रकरणामध्ये त्वरीत ट्रायलसाठी देशभरात विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात येणार आहे. कोर्टाला संबंधित खटला लवकरात लवकर निकाली काढावा लागणार आहे.

नपुसक बनविण्यासाठी काही रसायनांचा वापर करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे अशा गुन्ह्यात सामील झालेल्यांनाही कायद्यात काही शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. अशा लोकांचे नॅशनल रजिस्टर तयार करण्यात येणार आहे. असे करताना पिडितेची ओळख मात्र गुप्त ठेवण्यात येणार आहे. 

बलात्कारच्या गुन्ह्याची सुनावणी चार महिन्यात पूर्ण करणे सक्तीचे करण्यात आले आहे. यासाठी स्वतंत्र फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना करण्यात येणार आहे. बलात्कार विरोधी विभाग तयार करण्यात येणार असून, संबंधित विभाग घटना घडल्यापासून सहा तासाच्या आत योग्य त्या वैद्यकीय तपासण्या करून घेणार आहे. 

पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी मंगळवारी बलात्कार विरोधी कायदा 2020 या अध्यादेशावर स्वाक्षरी केली.  

ही घटना ठरली मार्गदर्शक

मागील काही दिवसांपूर्वी लाहोरमध्ये एक बलात्काराची भयान घटना घडली होती. संबंधित महिलेच्या दोन मुलांसमोर तिच्यावर अत्याचार झाले होते. या घटनेचे पडसाद संपूर्ण पाकिस्तानमध्ये उमटले. संबंधित महिलाही काही प्रमाणात या घटनेला जबाबदार असल्याचे पोलिसांनी सांगितल्यानंतर पाकिस्तानी नागरिक चिडले. त्यातूनच मोठा गदारोळ झाला होता. या घटनेतून या नवीन कायद्याबाबत चर्चा होऊन कायद्याला पुष्टी मिळाल्याचे मानले जाते. 

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com