दिल्लीत आंदोलक आक्रमक ! शेतकऱ्याचा मृतदेह ठेवला चाैकात, पंतप्रधानांनी जबाबदारी घ्यावी - Protesters in Delhi are aggressive! Put the farmer in the wheel, the Prime Minister should take responsibility | Politics Marathi News - Sarkarnama

दिल्लीत आंदोलक आक्रमक ! शेतकऱ्याचा मृतदेह ठेवला चाैकात, पंतप्रधानांनी जबाबदारी घ्यावी

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 26 जानेवारी 2021

दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना पोलिसांकडून लाठीचार्जदरम्यान एका 34 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू पोलिसांकडून झालेल्या गोळीबारात त्याला गोळी लागून झाल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे.

नवी दिल्ली : दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना पोलिसांकडून लाठीचार्जदरम्यान एका 34 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू पोलिसांकडून झालेल्या गोळीबारात त्याला गोळी लागून झाल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. त्याचा मृतदेह आरटीओ चाैकात ठेवला असून, याची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घ्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत.

शेतकऱ्यांसाठी केलेले नवीन कायदे केंद्र सरकारने मागे घ्यावेत, या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. दिल्लीत लाखो शेतकरी ठाण मांडून बसले होते. आज ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. ही रॅली सुरू असताना शेतकरी व पोलिसांत चकमकी घडून येत असून, दिलेला मार्ग सोडून शेतकरी इतर मार्गाने जावू लागले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रोकण्यासाठी अनेकदा धुराच्या नळकांड्या फोडून लाठिचार्ज करण्याची वेळ पोलिसांवर आली आहे. 

पोलिस व शेतकऱ्यांमध्ये चकमकी घडताना एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी झाडलेल्या गोळीमुळे शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचा दावा शेतकऱ्यांनी करून त्याचा मृतदेह आरटीओ चाैकात ठेवून शेतकरी आक्रमक झाले आहेत. पंतप्रधानांनी याची जबाबदारी घ्यावी, संबंधित शेतकऱ्याच्या कुटुंबियांना मदत मिळावी, अशा मागण्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत. 

केंद्रावर आरोपांच्या फैरी

आंदोलनादरम्यान केंद्र सरकारवर शेतकऱ्यांनी आरोपाच्या फैरी झाडल्या आहेत. कृषी कायदा हा शेतकऱ्यांच्या विरोधात असून, केंद्र सरकारने काही लोकांसाठीच हा तयार केल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. मृत्यू झालेल्या शेतकऱ्याची जबाबदारी आता केंद्राने म्हणजेच पंतप्रधानांनी घ्यावी, अशा मागणीसाठी शेतकरी आडून बसले असून, पोलिसांच्या चुकीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.

पोलिसांवर शेतकऱ्यांचा हल्ला

दरम्यान, दिल्लीत पोलिसांवर शेतकऱ्यांनी हल्लाबोल केला आहे. लाठिचार्ज झाल्यानंतर आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी पोलिसांवर हल्ला केल्याचे दिसून येत आहे. अनेकदा ट्रॅक्टर अंगावर घालण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप पोलिसांकडून होत आहे.

 

 

Edited By - Murlidhar KARALE

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख