विधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधक आक्रमक - Opposition aggressive on farmers' questions in the assembly | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पूरग्रस्तांना तातडीची मदत; घरात पाणी शिरलेल्यांना १० हजार, अन्न धान्याचे नुकसान झालेल्यांना ५ हजार रुपय मिळणार. वडेट्टीवार यांची घोषणा
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदार व खासदारांचे एक महिन्याचे वेतन पुरग्रस्तांना देण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत दिली.

विधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधक आक्रमक

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 14 डिसेंबर 2020

एकदा सांगितल्यानंतरही सदस्य ऐकत नसतील, तर त्याचा उपयोग नाही. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे मत मांडले आहे. त्यावर चर्चा करू, परंतु इतर सदस्यांनी गोंधळ करू नये.

मुंबई ः विधानसभेच्या अधिवेशनात आज शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून भाजपनेते आक्रमक झाले. त्यामुळे विधानसभेच्या कामकाजात गोंधळ निर्माण होऊन अखेर विधानसभा अध्यक्षांनी उभे राहून सदस्यांना शांत राहण्याचे आवाहन केले.

मुंबई येथे आज विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधी पक्षनेेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्या वेळी भाजप नेत्यांनी त्यांना जोरदार समर्थन दिले. त्यामुळे विधानसभेत गोंधळ निर्माण झाला. हे सर्व शांत करण्यासाठी विधानसभेचे अध्यश्र नाना पटोले यांनी अखेर उभे राहून सदस्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. असे असले, तरीही आमदार शांत होत नव्हते.

यावेळी आमदारांना बोलताना पटोले म्हणाले, ``एकदा सांगितल्यानंतरही सदस्य ऐकत नसतील, तर त्याचा उपयोग नाही. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे मत मांडले आहे. त्यावर चर्चा करू, परंतु इतर सदस्यांनी गोंधळ करू नये. तुम्ही सर्व शांत बसा. असा गोंधळ बरोबर नाही. मार्शलला माझा आदेश आहे, या पद्धतीने कोणी आले, तर त्यांना गेटवरून बाहेर काढा.`` 

अधिवेशन आठ दिवसांचे हवे

अध्यक्ष पटोले यांनी सदस्यांना सांगताना हे अधिवेशन केवळ दोन दिवसांचे आहे. प्रश्न अनेक आहेत. हे दोन दिवसांचे अधिवेशन लोकशाहीला परवडणारे नाही, असे मी सरकारला सांगेन. लोकांचे अधिकार व जनतेचे प्रश्न हे सभेतच मांडू शकतो. बाकी राज्यांमध्येसुद्धा अधिवेशन 8 ते 10 दिवसांचे अधिवेशन असते. आपणही अशी नियमावली करू. जनतेच्या प्रश्नांसाठी नियमावली तयार करू. पुढील अधिवेशन नियमित होईल, यापद्धतीची कार्यवाही करू, असे पटोले यांनी स्पष्ट केले. 

अधिवेशन किमान आठ ते दहा दिवसांचे व्हावे, यासाठी सत्ताधकारी व विरोधकांनी एकत्रित नियमावली तयार करण्यात येईल, त्यासाठी सर्वांचे सहकार्य असेल, असे ठरले.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख