370 कलम रद्द करण्याची ताकद कोणाच्या बापात नाही - No one has the power to repeal section 370 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोरोना इफेक्ट : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षा रद्द
सातारा : कोयना परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला. भुकंपाची साखळी वेळ-3.22 रिश्टर स्केल-3.00, वेळ-3.44 रिश्टर स्केल-2.8.

370 कलम रद्द करण्याची ताकद कोणाच्या बापात नाही

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

370 कलम पुन्हा लागू करण्याची कोणाच्या बापाची औकाद नाही. ही जनता त्यांना सोडणार नाही. महेबूबा मुफ्ती म्हणतात, काश्मीरचा झेंडा लावला नाही, तर तिरंगा लावू देणार नाही. अरे तुमच्या छातीवर बसून तिरंगा लावू.

मुंबई : ``महेबूबा मुफ्ती म्हणतात, काश्मिरमध्ये तिरंगा फडकू देणार नाही. अरे तुमच्या छातीवर बसून तिरंगा लावू. 370 कलम पुन्हा लागू करण्याची भाषा करता, कोणाच्या बापाची औकाद नाही, हे कलम पुन्हा लागू करण्याची,`` अशा शब्दांत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काॅंग्रेसला फटकारले. 

मुंबई येथे भाजपच्या बैठकित ते बोलत होते. ते म्हणाले, की शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजलीसाठी ज्यांना ट्विट करायची लाज वाटते, अशा लोकांसोबत तुम्ही राहता. काश्मीरमध्ये जी काॅंग्रेस गुठकर अलायन्समध्ये आहे, गुठकरचा पहिला अजेंटा काय, तर  कलम काय 370 पुन्हा लागू करू. 370 कलम पुन्हा लागू करण्याची कोणाच्या बापाची औकाद नाही. ही जनता त्यांना सोडणार नाही. महेबूबा मुफ्ती म्हणतात, काश्मीरचा झेंडा लावला नाही, तर तिरंगा लावू देणार नाही. अरे तुमच्या छातीवर बसून तिरंगा लावू. आता लागलाच आहे. जम्मूमध्ये, काश्मीरमध्ये शानेने भारताचा झेंडा फडकत आहे. तिरंग्याविषयी बोलणाऱ्यांसोबत तुम्ही राहता, हेच मोठे दुर्दव्य आहे. दुसरा अजेंटा काय तर जे पाकिस्तानमध्ये जायचे, म्हणतात, त्यांच्यासोबत राहून 370 कलम लागू करू. या देश विघातक लोकांसोबत तुम्ही जात असाल, तर त्यांची नितिमित्ता काय आहे, हे पहायची आहे.

शिवसेनेसोबत जाणार नाही

ते म्हणाले, की मी काल नितेशचे ट्विट वाचले. तुम्ही ज्यांच्यासोबत सत्ता चालविताय, त्यांना शिसवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत ट्विट करायला लाज वाटावी. आमचे शिवसेनेसोबत जमणार नाही. आम्ही भांडू, पण ज्या ठिकाणी बाळासाहेबांचे नाव येईल, त्यावेळी आम्ही ठामपणे उभे राहू, असे फडणवीस म्हणाले.

संजय राऊत नुसते बोलतात

संजय राऊत तुम्ही नुसते बोलता. हिंदुत्त्व कृतीत दिसले पाहिजे. हिंदुत्त्वाला जे मानत नाही, अशा शक्तींसोबत मांडीला मांडी लावून वक्तव्य करायचे, असे हिंदुत्त्व नसते. मोदींच्या नेतृत्त्वाखाली आत्मनिर्भर भारत निर्माणच्या कामात आपण सर्व सक्रीय आहोत.

अंगावर आला, तर खबरदार

भाजपला तुम्ही झुकवू शकत नाही. आम्ही ही लढाई लढू. जिंकू. जनता आमच्या सोबत आहे. किरिट सोमय्या प्रेस काॅन्फरन्स घेतात. त्याला उत्तर द्या ना. ही काय बनाना रिपब्लिक आहे काय. हे चालणार नाही. तुमची इच्छा असेल, तर दोन हात करायला आम्ही तयार आहोत. अशा प्रकारचा वार आमच्यावर करण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही लोकशाहीने लढू. पण आमच्या अंगावर आला, तर खबरदार. ते मान्य होणार नाही. खऱं तर आता आज आपल्याला प्रवीण दरेकर असतील, राणे असतील, महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात आपल्यालाल तयार करायची.  

स्वातंत्र्याची गळचेपी होतेय

सरकार येतात, सरकार जातात, बेकायदेशीर कारवाई करू नका. एव्हढेच लक्षात ठेवा, ही प्रक्रिया असते, जे नियमात असेल, तेच करा. या सरकारमध्ये स्वातंत्र्याची गळचेपी चालली आहे. आमच्या विरोधात यापूर्वी लोकांनी ट्विट केले. आम्ही कोणावर कारवाई केली का, मला आश्चर्य वाटते, कालपर्यंत अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून काही तथाकथित संपादक, पत्रकार शांत आहेत. म्हणजे सरकार बदलले की अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या बदलते का, असा प्रश्न आहे. अशा परिस्थितीत संघर्ष करण्याची वेळ आली आहे. अर्णब गोस्वामीला या सरकारने फसविण्याचा प्रयत्न केला. न्यायालयाने त्यांना चपराक दिली. यापूर्वी माझ्याविरोधात अनेक पक्षत्रकार बोलले, त्यांना मी काय जेलमध्ये टाकले का. दुटप्पी भूमिका आहे. खऱ्या अर्थाने या देशात तथाकथित लिब्रल म्हणविणारे गळचेपी करताहेत.

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख