मुंबई महापालिकेवर भगवाच फडकेल, पण भाजपचा ! - Mumbai Municipal Corporation will be saffron, but BJP's! | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोरोना इफेक्ट : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षा रद्द
सातारा : कोयना परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला. भुकंपाची साखळी वेळ-3.22 रिश्टर स्केल-3.00, वेळ-3.44 रिश्टर स्केल-2.8.

मुंबई महापालिकेवर भगवाच फडकेल, पण भाजपचा !

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

मुंबई येथे भाजपच्या बैठकित ते बोलत होते. नवीन कार्यकारिणीला मार्गदर्शन करताना त्यांनी अनेक विषयांना हात घालत त्यांना प्रोत्साहन दिले.

मुंबई : आगामी मुंबई महापालिकेच्या होणाऱ्या निवडणुकीत महापालिकेवर भगवाच फडकेल, पण तो भाजपचा असेल. 2022 मध्ये सत्ता बदलून टाकू. मागील वेळीही सत्ता बदलली असतील, पण दोस्तीत दिली. आता नाही. भाजप प्रत्येक प्रभागात नियोजन करून सत्तांतर करू, भाजपचाच भगवा फडकू, असे स्फुर्तीदायक मार्गदर्शन विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना केले.

मुंबई येथे भाजपच्या बैठकित ते बोलत होते. नवीन कार्यकारिणीला मार्गदर्शन करताना त्यांनी अनेक विषयांना हात घालत त्यांना प्रोत्साहन दिले. फडणवीस म्हणाले, की `राजाचा जीव पोपटामध्ये, काही लोकांचा जीव मुंबई महापालिकेमध्ये.` अशी अवस्था आहे. त्यामुळे भ्रष्ट्राचाराचा आगार असलेली ही महापालिकेची सत्ता 2022 मध्ये बदलून टाकू. त्या वेळीही बदलू शकलो असतो, दोस्तीत ती दिली. पण आता नाही. आता भाजप प्रत्येक वार्डात, बुथमध्ये सत्तांतर करेल. प्रत्येक वार्डात एक नेता द्या, बुथमध्ये राजकीय कार्यकर्ते तयार झाले पाहिजे. त्यांना राजकारण समजले पाहिजे. माझे युवा मोर्चाला आव्हान आहे, त्यांनी प्रत्येक बुथमध्ये किमान 50 युवा कार्यकर्त्यांशी संपर्क केलाच पाहिजे.

त्यांना सत्तेचा माज

फडणवीस म्हणाले, की महिला मोर्चाला विनंती आहे, की प्रत्येक बुथमध्ये किमान 100 घरातील महिलांशी संपर्क केलाच पाहिजे. बुथ कमिटीनेही 100 घरांपर्यंत पोहचून त्यांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचली पाहिजे. आता `मॅन टू मॅन` पोहचावे लागेल. मला वाटलं होतं, की सत्ता मिळाल्यानंतर काहीतरी चांगले होईल, पण त्यांच्या डोक्यात सत्ता गेली, त्यांचे पतन निश्चित आहे. वर्ष व्हायच्या आत त्यांना सत्तेचा माज झळकतो आहे. हा माज तोडावाच लागेल. जनतेचा विचार करणारे लोक सत्तेवर आणावेच लागेल. मला विश्वास आहे, की भाजपची नवीन टीम फळी तयार करील 2022 साली मुंबई महापालिकेवर भगवाच फडकेल, पण भाजपचा. कुठलीही विचारांची मिसळ नसलेला असेल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.

 

Edited By  - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख