विजबिलात मदत करावी, ही काॅंग्रेसची भूमिका

विजबिलाबाबत भाजपनेते आंदोलने करीत आहेत. परंतु सरकारची भूमिका सर्वसामान्यांना मदत करण्याचीच आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. त्यामुळे विरोधकांनी कितीही आंदोलने केली, तरी ते केवळ दिखावा आहेत.
 balasaheb-thorat.jpg
balasaheb-thorat.jpg

मुंबई : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सरकारने दहा हजार कोटींचे पॅकेज जाहीर करून मदत केली आहे. विजबिलाबाबतही सरकारची सकारात्मक चर्चा झाली असून, विज बिलात मदत करावी, अशीच काॅंग्रेसची भूमिका आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चाही झाली आहे, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

विजबिलाबाबत भाजपनेते आंदोलने करीत आहेत. परंतु सरकारची भूमिका सर्वसामान्यांना मदत करण्याचीच आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. त्यामुळे विरोधकांनी कितीही आंदोलने केली, तरी ते केवळ दिखावा आहेत. आम्ही ग्राहकांचे हित लक्षात घेऊनच निर्णय घेणार आहोत. काॅंग्रेसची भूमिका कायम विजेसाठी मदत करण्याचीच राहिली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली असून, लवकरच याबाबत निर्णय होईल, असे थोरात यांनी सांगितले.

केंद्रीय संस्थांचा गैरवापर

काही केंद्रीय संस्थांच्या कामावर आमचा आक्षेप आहे. राजकीय कारणांसाठी या संस्थांचा वापर होत असून, जिथे भाजप सरकार आहे, तेथे रेड पडल्याचे दिसले नाही. गेल्या वर्षांत असे दिसून आले नाही, असा आरोप थोरात यांनी केला.

भाजप सरकारवर टीका करताना थोरात म्हणाले, की संस्था या जनतेच्या हितासाठी आहेत. काही केंद्रीय संस्था मात्र जनतेचे हित न पाहता ते संबंधित राजकारण्यांचे पाहतात. दुर्दवाने असे होत आहे. राजकीय कारणांसाठी संस्थांचा वापर होऊ नये. अशा अनेक संस्थांवर आमचा अक्षेप आहे. लोकशाहीत कोणी विरोधात बोललं की ते त्यावर अॅक्शन घेतात. भाजप सरकार हे लोकांसाठीच आहे का, असा प्रश्न पडतो, असा आरोप थोरात यांनी केला.

मी येणार, मी येणार हे दिवास्वप्न

भाजपचे नेते महाविकास आघाडी सरकारवर सतत टीका करतात. `मी येणार, मी येणार` असे म्हणणाऱ्यांचे हे दिवास्वप्न आहे. सध्या आॅपरेशन कमळ या शिर्षकाखाली दबाव आणण्याचा त्यांचा प्रयत्न असेल, परंतु त्याला लोक घाबरणार नाहीत. महाविकास आघाडी सरकारमध्ये आम्ही सर्वजण एकत्रित काम करीत आहोत. एकमेकांना मदत करीत आहोत. आगामी काळातही तशीच मदत राहणार आहे, असे थोरात यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली. आम्ही 10 हजार कोटींचे पॅकेज दिले. शेतकऱ्यांना भरपाई देण्यात आली. याच प्रश्नी ओरडणाऱ्या भाजप नेत्यांनी याचे आत्मपरीक्षण करावे. केंद्राचे मात्र एकही पथक मदत घेऊन आल्याचे ऐकीवात नाही. केंद्र सरकारकडून महाराष्ट्र राज्याला सापत्न वागणूक देत आहे. याचा निषेध सर्वांनीच केला पाहिजे. क्रूड आॅलच्या किमती कमी झाल्या असताना केंद्र सरकार मात्र नफेखोरी करीत आहे, असा आरोप थोरात यांनी केला.

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com