मदतीत भेदभाव होतोच कसा ! अधिवेशनात मुनगंटीवार भडकले - How to help discriminate! Mungantiwar erupted at the convention | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोरोना इफेक्ट : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षा रद्द
सातारा : कोयना परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला. भुकंपाची साखळी वेळ-3.22 रिश्टर स्केल-3.00, वेळ-3.44 रिश्टर स्केल-2.8.

मदतीत भेदभाव होतोच कसा ! अधिवेशनात मुनगंटीवार भडकले

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 15 डिसेंबर 2020

विधानसभेच्या अधिवेशनाच्या आज दुसऱ्या दिवशी मुनगंटीवर यांनी मदतीची आकडेवारीच सभागृहापुढे मांडली.

मुंबई : पूरग्रस्तांना मदत देताना भेदभाव केला जातो. शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये मदत देताना भेदबाव होतो, जवळचा-दूरचा असा भेदवा होतो. हा भेदभाव होतोच कसा, असा प्रश्न करीत भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारचे वाभाडे काढले. यासाठी त्यांनी अनेक दाखले दिले.

विधानसभेच्या अधिवेशनाच्या आज दुसऱ्या दिवशी मुनगंटीवर यांनी मदतीची आकडेवारीच सभागृहापुढे मांडली. 

ते म्हणाले, सत्ताधाऱ्यांनी दिलेली आश्वासने पाळली नाहीत. जाहीरनाम्यात लिहिल्याप्रमाणे होत नाही. शेतकऱ्यांचा सात-बारा कोरोना करू म्हणाले. कुठे झाला कोरा. केलेल्या घोषणांची अंमलबजावणी होत नाही. ज्यांच्याकडे जास्त कर्ज आहे, त्यांनी भरावे, त्यांना मदत करू, असे त्यांनी सांगितले, परंतु त्यांना मदत दिली नाहीच, उलट `वाईन और जिंदगी फाईन`. वाईनवाल्यांना मदत दिली. शेतकरी रडतो आहे, त्यांना खरी गरज असताना वाईन उद्योगांना त्यांनी मदत केली, हा कुठला न्याय आहे. ज्यांनी दीड लाखांचे कर्ज भरले, त्याना मदत द्यायची नाही का, असा सवाल त्यांनी केला.

पुरग्रस्तांच्या मदतीबाबत झालेल्या दुजाभाव आमदार मुनगंटीवार यांनी सभागृहासमोर मांडला. ते म्हणाले, की मदत देताना आवडता-नावडता भाग असा दुजाभाव झाला. महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात पूर आला तरी मदत व्हावी. एखादा अध्यादेश केवळ सांगलीसाठीच आहे का. आम्ही काय पाप केले, असा प्रश्न मुनगंटीवर यांनी उपस्थित केला.

कोण म्हणतं केंद्राने मदत केली नाही

केंद्राने मदत केली नाही, अशा सरकारच्या आरोपाबाबत मुनगंटीवर म्हणाले, की आर्यभट्टाने शुन्याचा शोध लावला. पण या सरकारने ज्यांची जबाबदारी शुन्य आहे, हा नवीन शोध लावला. म्हणे केंद्राने मदत केली नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. डाॅ. आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, तिथं रडता का हो. तुम्ही केंद्राकडे मदत मागायला काय हरकत आहे. ही अफवा कोणी पसरवली, की केंद्र मदत करीत नाही.केंद्राच्या बाबतीत नेहमीच रडायचे का. मी आकडे आणले आहेत. केंद्र सरकार आम्हाला मदत करीत नाही, असे हे नते म्हणतात, हे खोटे आहे. खोटं बोल पण रेटून बोल, अशी म्हण आहे. आता नवीन म्हण या सरकारने आणलीय. `खोटं बोल पण सर्वांनी ठरवून बोल,` खोटं कशाला बोलता. केंद्राने मोठी मदत दिली, ती जाहीरपणे सांगा. आणि केंद्राने जाहीर केलेली मदत कुठे जात नसते. ती मिळतच असते, हे लक्षात ठेवा, असा सल्ला त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिला.

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख