आम्हाला किराणावाले समजता का? अब्दुल सत्तार भडकले - Do we understand groceries? Abdul Sattar erupted | Politics Marathi News - Sarkarnama

आम्हाला किराणावाले समजता का? अब्दुल सत्तार भडकले

दिपेश परब
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020

या ठिकाणी संबंधित खात्याचा राज्यमंत्री येतो, तर याठिकाणी बंदर अधिकारी तसेच यासंदर्भातील जबाबदार अधिकारी उपस्थित नाही, हेे ढिसाळ नियोजन आहे. याची लेखी तक्रार केली जाईल.

वेंगुर्ले : पाच दिवसांपूर्वी दौर्‍याचे नियोजन दिले असतानाही रेडी बंदर येथे कोणीही जबाबदार अधिकारी उपस्थित नाही. मी स्वतः मंत्री येतो, तर माझे हे हाल असतील तर काय तुम्ही जबाबदारी पार पडणार. तुमच्यासारखा बेजबाबदार अधिकारी आम्हाला काय किराणा दुकानदार समजता काय? अशा कडक शब्दात महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांवर महसूल, ग्रामविकास, बंदरे राज्यमंत्री अब्दुल सत्तार भडकले.

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी काल रेडी बंदराची पाहणी केली. या वेळी त्यांच्यासोबत आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांच्यासहीत जिल्ह्यातील अधिकारी, शिवसेना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी येथील बंदर निरीक्षक यांच्याकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने राज्यमंत्री सत्तार भडकले. या वेळी त्यांनी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सैनी यांना मोबाईलवरून संपर्क साधत धारेवर धरले.

या ठिकाणी संबंधित खात्याचा राज्यमंत्री येतो, तर याठिकाणी बंदर अधिकारी तसेच यासंदर्भातील जबाबदार अधिकारी उपस्थित नाही, हेे ढिसाळ नियोजन आहे. याची लेखी तक्रार केली जाईल. पाच दिवसांपूर्वी दौर्‍याचे नियोजन दिले होते. याठिकाणी रेडी पोर्ट कंपनीचे सर्व अधिकारी उपस्थित आहेत; मात्र शासकीय अधिकारी नाहीत. तुमच्यासारखा एखादा आयएएस ऑफिसर अशा बेजबाबदारपणाने नेमणूक करतो. तुम्ही काय आम्हाला किराणा दुकानदार समजता काय ? अशा कडक शब्दात राज्यमंत्री सत्तार भडकले.

 

Edited By - Murlidhar Karale
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख