तिसऱ्यांत चाैथा आला, तरीही महाराष्ट्रात ते भुईसपाटच होतील - bjp news, mira bhaindar's bjp office open | Politics Marathi News - Sarkarnama

तिसऱ्यांत चाैथा आला, तरीही महाराष्ट्रात ते भुईसपाटच होतील

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021

उत्तर प्रदेशात पाहिले सपा, बसपा, काॅंग्रेस एकत्र आले, तरीही ते भुईसपाट झाले. हीच स्थिती महाराष्ट्रातही होणार आहे.

मुंबई : येत्या काळात भाजपचा विस्तार वाढवायचा आहे. यापुढे तिसऱ्यांत आता चाैथा किंवा पाचवा आला, तरीही आगामी काळात उत्तर प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रात ते भुईसपाटच होतील, असा टोला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला लगावला.

मिरा भाईंदर येथील भाजपच्या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. भाजपचे महामंत्री रविंद्र चव्हाण, आमदार निरंजन डावखरे, हेमंत म्हात्रे, अशोक तिवारी, रवी व्यास, हसमुख गेहलोत आदी या वेळी उपस्थित होते. हा विस्तार आपण केला, तर इतर राज्यात ते भूईसपाट झाले. तीच परिस्थिती महाराष्टातही दिसेल. हे कार्यालय विस्ताराचे केंद्र झाले पाहिजे. सामान्य माणसांच्या व्यथा वेदना सोडविण्याचे केंद्र झाले पाहिजे.

फडणवीस म्हणाले, की अमित शहा राष्ट्रीय अध्यक्ष असताना देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात भाजपचे कार्यालय असावे, असा निर्णय झाला. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात कार्यालय आहेत. काही ठिकाणी जमीन मिळायला, कार्यालय व्हायला वेळ लागेल. आवश्यकता असेल, तर भाड्याने जागा घ्यावी. आपल्या सर्वांना माहिती आहे, की जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. जगात सर्वात जास्त सदस्य असलेला पक्ष आहे. सर्वाधिक लोकप्रतिनिधी भाजपचे आहेत. त्यामुळे जगातला आणि देशातील मोठा पक्ष म्हणून आपण काम करीत आहोत. या पक्षाचे काम नीट चालले पाहिजे, हे कामकाज नीट चालावे, यासाठी कार्यालय आवशय्क असते. या निमित्ताने एक स्थायी जागा असते. समाजातील कुठल्याही व्यक्तीला वाटले, की मला पक्षाच्या माध्यमातून आपली समस्या सोडवायची, तर त्यांची सुविधा झाली पाहिजे. एक संघटनात्मक काम म्हणून हे कार्यालय काम करते. येत्या काळात कुणाचीही कुबडी न वापरता आपण सत्ता पक्ष होऊ शकतो. प्रत्येक बुथमध्ये आपल्याला नव्याने रचना करायची आहे. बुथ संपर्क अभियान सुरू होत आहे. 

ते म्हमाले, की उत्तर प्रदेशात पाहिले सपा, बसपा, काॅंग्रेस एकत्र आले, तरीही ते भुईसपाट झाले. हीच स्थिती महाराष्ट्रातही होणार आहे. असा संभ्रम आहे, की महिला आणि पुरुष सारखेच मतदान करतात. बिहारच्या निवडणुकीत मात्र महिलांचे मतदान जास्त असल्याचे दिसून आले. त्यामुळे महिलांची समिती वेगळी बनवायची आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख