दिल्लीत मोठा निर्णय ! पोलिसबळात वाढ, कठोर कारवाईचे आयुक्तांचे आदेश - Big decision in Delhi! Increase in police force, strict action ordered by the commissioner | Politics Marathi News - Sarkarnama

दिल्लीत मोठा निर्णय ! पोलिसबळात वाढ, कठोर कारवाईचे आयुक्तांचे आदेश

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 26 जानेवारी 2021

लवकरच सीआरपीएफ च्या 10 तुकट्या दाखल होणार आहेत. तसेच अर्धसैनिक कंपन्यांच्या 15 तुकड्या येणार असून, विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहेत.

नवी दिल्ली : दिल्लीत शेतकऱ्यांचे सुरू असलेल्या आंदोलनावर उपाययोजना करण्यासाठी पोलिस प्रशासनाने मोठा निर्णय घेतला असून, लवकरच सीआरपीएफ च्या 10 तुकट्या दाखल होणार आहेत. तसेच अर्धसैनिक कंपन्यांच्या 15 तुकड्या येणार असून, विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहेत. त्यामुळे संध्याकाळ होतानाच दिल्लीत हे आंदोलन अधिक चिघळण्याची चिन्हे आहेत.

दिल्लीत आज सुरू असलेल्या आंदोलनात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. त्यामुळे शेतकरी अधिक चिडले. लाल किल्ल्याकडे जात असताना शेतकऱ्यांवर लाठीचार्ज झाला. शेतकऱ्यांनी बसची मोडतोड केली. तर इतर गाड्यांचीही मोडतोड करण्यात आली. पोलिसांची गाडीही फोडली. याच दरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला. धुराचे नळकांडे फोडून शेतकऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. शेतकऱ्याचा मृत्यू पोलिसाची गोळी लागून झाल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला.

दरम्यान, सायंकाळी हे आंदोलन हटविण्यासाठी दिल्लीच्या पोलिस आयुक्तांनी सीआरपीएफच्या 10 तुकट्या तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अर्धसैनिकांच्या 15 तुकड्याही आंदोलनासाठी पाठविण्यात येणार असून, पोलिस बळाचा वापर वाढविण्यात आला आहे. पोलिसांचे वाहन तोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशार देण्यात आला आहे.

गृहमंत्री अमित शहाच्या घरी बैठक

आंदोलनाबाबत गृहमंत्री अमत शहा यांच्या घरी महत्त्वाची बैठक होत असून, त्यामध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. त्यासाठी महत्त्वाचे नेते, अधिकारी दाखल झाल्याचे सूत्रांकडून समजते.

पोलिस कर्मचारी, पत्रकार जखमी

आंदोलनाच्या दरम्यान पत्रकारांचे कॅमेरे तोडण्याचे प्रयत्न झाल्याचा आरोप होत आहे. तसेच काही पोलिस जखमी झाले असून, शेतकऱ्यांचे आंदोलन आटोक्यात आणण्यासाठी विशेष प्रयत्न सूर आहेत.

 

Edited By - Murlidhar Karale

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख