मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडीने विजबिले जास्त देऊन गरिबांचा विश्वासघात केला आहे. बिले सुधारून देऊ म्हणाले. घोषणाही केल्या, परंतु लवलत तर सोडाच परंतु अतिरिक्त बिलेही कमी केली नाहीत. हे विश्वासघातकी सरकार आहे, अशा शब्दांत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी समाचार घेतला.
भाजपच्या बैठकित फडणवीस बोलत होते. ते म्हणाले, की महाराष्ट्रात इतके भयानक विजबिले आले, परंतु उर्जामंत्र्यांनी सांगितले, ती बिले बरोबर आहेत. आमच्या किरिट सोमय्यांनी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून बिले जमा केली. काहींना शंभर पट, दोनशे पट आलेली बिले होते. गरीबांना 50 हजार बिले आली. उर्जामंत्र्यांनी सांगतले, की ते सुधारून देऊ, काही सवलत देऊ, गरीबांना फ्री देऊ, परंतु काहीच केले नाही. आता पुन्हा उर्जामंत्र्यांनी सांगितले, की वीज वापरली आहे, तर पैसे भरावेच लागतील. हा कुठला न्याय आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
त्यांना आकडे तरी समजतात का
फडणवीस म्हणाले, की कोणालाही सवलत दिली नाही. गरिबांचा हा विश्वासघात आहे. तीन पक्षाचे नेते पत्रकार परिषदेत गेले. तेथे घोषणा केली, हजार कोटी देणार, सवलत देणार परंतु काल मात्र वीज वापली, तर पैसे भरावे लागतील, असे ठणकावून सांगितले. हे सरकार विश्सवासघातकी आहे. गरीबांची इथे थट्टा चालली आहे. काहीही झाले की केंद्र सरकारकडे बोट दाखवायचे. केंद्र सरकारने 90 हजार कोटींचे पॅकेज दिले होते, का घेतले नाही. त्यांनी सांगतले होते, प्रत्येक युटिलीटीसाठी कर्ज देऊ, युटीलिटीच्या बॅलंसिटवर कर्ज घेण्याची क्षमता नसेल, तरीही देणार आहोत, असे परंतु या नेत्यांनी ते घेतले नाही. तुम्हाला खुल्या बाजारातून घ्यायचे होते. त्या वेळी उर्जामंत्री म्हणाले, की या सरकारने 50 हजार कोटींची वसुली केली. त्यांना काय आकडे समजतात का, असा टोला फडणवीस यांनी लगावला.
सावकारासारखे पैसे वसुल का करता
फडणवीस म्हणाले, की मी आमच्या त्या वेळच्या ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी देशात सर्वांत चांगले बॅलन्ससीट आणले होते. आम्ही सावकारी काम करीत नव्हतो. तुम्ही सावकारीसाखे गरीबांकडून वीजबिल वसुली करतात. कोणालाही त्यांनी मदत दिली नाही. शेतकऱ्यांना, बारा बलुतेदारांना मदत नाही. तुम्ही मेले तरी चालेल, परंतु आम्ही तुम्हाला मदत करणार नाही, असे त्यांनी ठरवलं होतं, असा आरोप त्यांनी केला.
बदल्यांचा सपाटा का
फडणवीस म्हणाले, की त्यांनी बदल्या करून माल कमावण्याचा सपाटा लावला. किती बदल्या कराल. बदल्यांचा बाजार मांडला. सामान्य माणूस बोलायला लागला, की एका-एका माणसांना चार-चार एजंट फोन करीत होते. हे विश्वासघातली सरकार आहे, असे ते म्हणाले.
Edited By - Murlidhar Karale

