अर्णब गोस्वामीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी - Arnab Goswami remanded in judicial custody for four days | Politics Marathi News - Sarkarnama

अर्णब गोस्वामीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020

पोलिसांवर मारहाणीचे अर्णब गोस्वामी यांनी केलेले आरोप कोर्टाने फेटाळले आहेत. गोस्वामी यांना आता 14 दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अलिबाग : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांची पाच तास सुनावणी झाली. पोलिसांवर मारहाणीचे अर्णब गोस्वामी यांनी केलेले आरोप कोर्टाने फेटाळले असून, त्यांना आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

अर्णब गोस्वामी यांच्यासह आयकास्ट स्लॉशस्काय मिडियाचे फिरोज शेख, मगरपट्टा येथील ‘स्मार्ट वर्क्सचे नितेश सारडा यांनाही पोलिसांनी अलिबाग येथे न्यायालयात सायंकाळी 7.00 वाजता हजर केले होते.

वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषणने मुंबई पोलिसांच्या मदतीने बुधवारी (ता. 4) अर्णब गोस्वामी यांना मुंबईतून त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्यानंतर सायंकाळी त्यांना प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्यासमोर हजर करण्यात आले. सकाळी 11.00 वाजता अर्णब गोस्वामी यांना आलिबाग पोलिस ठाण्यात आणण्यात आले होते. एक तास चौकशी केल्यानंतर प्रथम साडेबारा वाजता मुख्य न्याय दंडाधिकारी सुनैना पिंगळे यांच्या कोर्टासमोर हजर करण्यात आले. यावेळेस अर्णब गोस्वामी यांनी आपल्याला मारहाण झाल्याचे सांगत वैद्यकिय तपासणीची मागणी केली होती. त्यानंतर  दुपारी मेडीकल प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सायंकाळी पाच वाजता पुन्हा कोर्टासमोर हजर करण्यात आले होते.

ज्येष्ठ वकील अॅड. आबाद फोडा यांनी व्हीडीओ कॉन्फर्सींगव्दारे युक्तीवाद करीत कोठडी रद्द करण्याची मागणी केली होती. अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी ‘रिपब्लिक टीव्ही’चे अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांविरुद्ध अलिबाग पोलिसांत  दोन वर्षा पूर्वी गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. अर्णब व अन्य दोघांनी नाईक यांचे पैसे थकवल्याने ते निराश झाले होते. मुळचे कावीर येथे राहणारे अन्‍वय नाईक हे मुंबईत व्‍यवसायानिमित्‍त राहत होते. अन्वय यांचा मुंबईत‘कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड’ या नावाने अंतर्गत वास्तूरचना आणि सजावटीचा व्यवसाय होता.
 

Edited By- Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख