अजितदादांचा गाैप्यस्फोट ! भाजपचे अनेक आमदार महाविकास आघाडीच्या वाटेवर - Ajit Dad's gossip blast! Many BJP MLAs are on the path of Mahavikas Aghadi | Politics Marathi News - Sarkarnama

अजितदादांचा गाैप्यस्फोट ! भाजपचे अनेक आमदार महाविकास आघाडीच्या वाटेवर

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 16 डिसेंबर 2020

तीन पक्षाचे सरकार स्थापन झाल्याने तुमचा हातातोंडाशी आलेला घास गेला. आता एक वर्ष पूर्ण होऊन गेले, सहा महिन्यांत सरकार पडणार असे सांगत होते, आता पहा. येत्या चार महिन्यात अनेक आमदार महावविकास आघाडीकडे येतील.

मुंबई : नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत सुशिक्षित, पदवीधर मतदारसंघाने भारतीय जनता पक्षाला नाकारले आहे. तीन पक्षाचे सरकार स्थापन झाल्याने तुमचा हातातोंडाशी आलेला घास गेला. आता एक वर्ष पूर्ण होऊन गेले, सहा महिन्यांत सरकार पडणार असे सांगत होते, आता पहा. येत्या चार महिन्यात अनेक आमदार महावविकास आघाडीकडे येतील, असा गाैप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

विधानसभेच्या अधिवेशनात काल पुरवणी मागण्यांच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेदरम्यान पवार यांनी राजकीय बाॅंब टाकला. पवार म्हणाले, की धुळे-नंदुरबारमध्ये अमरीश पटेल निवडून आले असले, तरी ते आमच्याकडूनच तिकडे गेलेले आहेत. त्यांच्या विचारांची नाळ आमच्याशीच आहे. त्यामुळे ते परत केव्हा येतील, हे तुम्हाला कळणारही नाही. पुण्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचाच पराभव झाला आहे. त्यामुळे भाजपला ही धोक्याची घंटा समजावी.

मागील काही दिवसांपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड करण्यात आला आहे. त्यामध्ये जीन्स पॅन्ट चालणार नाही. महिलांनीही कपड्यांबाबत बंधणे आहेत. खादीला प्रोत्साहन दिलेले आहे. याबाबत बोलताना पवार म्हणाले, की सरकारी कर्मचाऱ्यांच्या ड्रेसकोडबाबत सरकारने काही मुद्दे जाहीर केले असले, तरी त्याबाबत सरकार फिरविचार करीत आहे.

दरम्यान, भाजप नेत्यांनी गेल्या वर्षभरापासून मी येणार असे सांगून लवकरच महाविकास आघाडीचे सरकार पडेल असे सांगितले होते. तीन चाकांचे सरकार टिकूच शकत नाही, असे वारंवार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही सांगितले. माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी तर डिसेंबरअखेर हे सरकार पडेल, असा गाैप्यस्फोट करून चर्चा घडवून आणली. या पार्श्वभूमीवर काल अजित पवार यांनी केलेला गाैप्यस्फोट खूप काही सांगून जातो. सरकार पडण्याचे सोडाच, उलट भाजपचेच काही आमदार आपल्या पक्षाच्या वाटेवर असल्याचे अप्रत्यक्षरित्या सांगून पवार यांनी भाजपनेत्यांना टोमना मारला आहे. त्यामुळे आगामी काळात पक्षीय पातळीवर वेगवान हालचाली होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

 

अजित पवार यांनी स्विकारले मुनगंटीवार यांचे चॅलेंज

विधानसभेत एका विषयावर बोलताना भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले, की माझ्या भाषणात अडथळे आणू नका. कारण जो अडथळे आणतो, तो पुन्हा निवडून येत नाही. त्यावर उपमुख्यमंत्री पवार यांनी चॅलेंज दिले. चला, मी तुमचे चॅलेंज स्विकारतो. पुढच्या निवडणुकीत मलाच हरवून दाखवा. यावर सभागृहात हंशा पिकला.

 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख