विनय गौडा सातारा जिल्हा परिषदेचे नवे सीईओ; भागवत यांची बदली - Vinay Gowda new CEO of Satara Zilla Parishad; Bhagwat's replacement | Politics Marathi News - Sarkarnama

विनय गौडा सातारा जिल्हा परिषदेचे नवे सीईओ; भागवत यांची बदली

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

ऐन कोरोना संसर्गाच्या काळात सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांची अचानक बदली करण्यात आली आहे. यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच श्री. भागवत यांना कोणतीही नियुक्ती दिलेली नाही. 

सातारा : ऐन कोरोना संसर्गाच्या काळात सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची बदली झाली आहे. आज अचानक झालेल्या या फेरबदलामध्ये नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांची साताऱ्यात नियुक्ती देण्यात आली आहे. मात्र, संजय भागवत यांना अद्याप कोणतीही नियुक्ती दिलेली नाही. 

2015 च्या आयएएसच्या बॅचचे अधिकारी असलेले विनय गौडा यांची प्रशाकिय अधिकारी सेवेची सुरवात नंदूरबारला सहायक जिल्हाधिकारी म्हणून झाली. त्यानंतर त्यांची नंदूरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. आज त्यांची सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती झाली आहे.

ऐन कोरोना संसर्गाच्या काळात सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांची अचानक बदली करण्यात आली आहे. यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच श्री. भागवत यांना कोणतीही नियुक्ती दिलेली नाही. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख