कंगनाच्या संरक्षणासाठी आरपीआयचे कार्यकर्ते सज्ज : रामदास आठवले - RPI workers ready for Kangana's protection Says Minister Ramdas Athavale | Politics Marathi News - Sarkarnama

कंगनाच्या संरक्षणासाठी आरपीआयचे कार्यकर्ते सज्ज : रामदास आठवले

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

सरकारवरील टिका मुंबईवरील टिका असल्याचा कांगावा करून कंगना राणावतला मुंबईत पाय ठेऊ देणार नाही, अशी धमकी देणे लोकशाहीला धरून होणार नाही. त्यामुळे नऊ तारखेला कंगना राणावत मुंबईत येईल तेंव्हा तिचे रक्षण करण्यास रिपब्लिकन पक्ष पुढे येईल, असा इशारा मंत्री आठवले यांनी दिला आहे.

मुंबई  : लोकशाहीत प्रत्येकाला टीका टिप्पणी करण्याचा अधिकार आहे. मत मंडण्याचे स्वातंत्र्य आहे. कंगना राणावतने मुंबईवर टिका केली नसून राज्यसरकार वर टिका केली आहे. टिका केली म्हणून तिला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही, अशी भूमिका घेणे लोकशाही विरोधी आहे. कंगना राणावत यांना भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार मुंबईत राहण्याचा अधिकार आहे. तिला कोणी विरोध करण्याचा प्रयत्न केला तर रिपब्लिकन पक्ष कंगनाला संरक्षण देईल, असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे.  

तसेच नऊ तारखेला कंगना मुंबईत येणार असून विमानतळ आणि कंगनाच्या निवासस्थानी रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते तिच्या रक्षणासाठी सज्ज राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले अआहे. आज अभिनेत्री कंगना राणावत यांनी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना दुरध्वनी करून आपल्याला संरक्षण देण्याची जाहीर भूमिका घेऊन रिपब्लिकन पक्षाने दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानले.

यावेळी झालेल्या चर्चेत कंगना राणावत यांनी आपण लहानपणापासून मुंबईत वास्तव्यास असून मुंबई आणि महाराष्ट्राची मी परमभक्त असल्याचे सांगितले. यावर श्री. आठवले यांनी रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते कंगना राणावत यांच्या रक्षणासाठी मुंबई विमानतळ आणि त्यांच्या निवास्थानी ही सज्ज राहतील असे आश्वासन दिले. 
मुंबई आणि महाराष्ट्राविरुद्ध आम्ही एक शब्दही खपवून घेणार नाही.

मात्र सरकारवरील टिका मुंबईवरील टिका असल्याचा कांगावा करून कंगना राणावतला मुंबईत पाय ठेऊ देणार नाही, अशी धमकी देणे लोकशाहीला धरून होणार नाही. त्यामुळे नऊ तारखेला कंगना राणावत मुंबईत येईल तेंव्हा तिचे रक्षण करण्यास रिपब्लिकन पक्ष पुढे येईल, असा इशारा मंत्री आठवले यांनी दिला आहे. 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना सरकारमध्ये सहभागी आहे.

त्यामुळे शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी अभिनेत्री कंगना राणावतला धमकी देणे
योग्य नाही. कंगना राणावत यांनी सुशांतसिंह मृत्यू प्रकरणात मांडलेली मते असो की सुरक्षा यंत्रणा वरून राज्य सरकार वर केलेली टिका असो. याप्रकरणी कंगनावर तिला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही, अशी भूमिका घेणे योग्य नाही.

कंगना राणावतला मुंबईत पाऊल ठेवण्यास कोणी विरोध करेल तर रिपब्लिकन पक्ष कंगनाचे संरक्षण करील, असा इशारा श्री. आठवले यांनी आज दिला आहे. अभिनेत्री कंगना यांनी मुंबईला आपल्या मातृस्थानी मानत असल्याचा खुलासा केला आहे. त्यामुळे कंगना यांनी मुंबई किंवा महाराष्ट्राविरुध्द मत मांडलेले नाही. सरकार आणि राज्यच्या कारभारावर टिका करण्याचे विचारस्वातंत्र्य सर्वसामान्यांप्रमाणे कंगनालाही आहे, असे श्री. आठवले यांनी स्पष्ट केले आहे. 

 

 

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख