जनतेसाठी शरद पवारांचा हातभार; दिली रेमडिसिव्हरची एक हजार इंजेक्शन्स - NCP Leader Sharad Pawar Donated One Thousand Remedisiver Injections | Politics Marathi News - Sarkarnama

जनतेसाठी शरद पवारांचा हातभार; दिली रेमडिसिव्हरची एक हजार इंजेक्शन्स

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

यावरून रेमडिसिव्हरचा तुटवडा भासत असल्याचे खासदार शरद पवार यांना समजताच त्यांनी तातडीने एक हजार इंजेक्शन्स उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली. तसेच या इंजेक्शन्सचा सर्वप्रथम गरजू आणि गरीब जनतेसाठी वापर करा, अशी सूचनाही त्यांनी आरोग्यमंत्र्यांना केली. 

सातारा : राज्यात सध्या कोरोनावरील प्रभावी अशा रेमडिसिव्हर इंजेक्शनचा तुडवडा भासत आहे. याबाबतची माहिती समजताच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज तात्काळ एक हजार इंजेक्शन्स उपल्ध करून देण्याची व्यवस्था केली. ही इंजेक्शन्स सर्वप्रथम गरजू आणि गरिब जनतेसाठी वापरावीत, अशी सूचनाही त्यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना केली. 
 
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी खासदार शरद पवार यांच्या संकल्पनेतून जनता दरबार उपक्रम सुरू करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात आज सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे हे जनता दरबार उपक्रमात सहभागी झाले आहेत.

त्यांनी जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाय योजना करण्याचा प्रयत्न केला. यावेळी अचानक राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी काही माध्यमांच्या प्रतिनिधींनी आरोग्य मंत्र्यांकडे रेमडिसिव्हरच्या इंजेक्शन्सचा तुटवड्याबाबतची विचारणा केली.

यावरून रेमडिसिव्हरचा तुटवडा भासत असल्याचे खासदार शरद पवार यांना समजताच त्यांनी तातडीने एक हजार इंजेक्शन्स उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली. तसेच या इंजेक्शन्सचा सर्वप्रथम गरजू आणि गरीब जनतेसाठी वापर करा, अशी सूचनाही त्यांनी आरोग्यमंत्र्यांना केली. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख