कितीही आदळाआपट करा, ''महाविकास''चे सरकार पुढील दहा वर्षे काम करेल - Mahavikas Aghadi government will work for next ten years Says Shivsena Minister Shambhuraj Desai | Politics Marathi News - Sarkarnama

कितीही आदळाआपट करा, ''महाविकास''चे सरकार पुढील दहा वर्षे काम करेल

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 20 सप्टेंबर 2020

शिवसेनेचे नेतृत्व असलेल्या या सरकारला दोन्ही काँग्रेसने भक्कम पाठिंबा दिलेला आहे. कोणी कसलाही प्रयत्न केला तरी हे महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे दोनशे टक्के पूर्ण करेल. तसेच पुढील दहा वर्षेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करेल. त्यामुळे विरोधकांनी आपला वेळ व्यर्थ वेळ घालवू नये.

सातारा : सध्या महाविकास आघाडीचे सरकार कोविड संसर्ग रोखण्याच्या लढाईत गुंतलेले आहे. त्यामुळे कोणी कितीही आदळाआपट केली, तरी किंचितसाही फरक या सरकारवर पडणार नाही. आमचे महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे दोनशे टक्के पूर्ण करेल. तसेच पुढील दहा वर्षेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करेल. विरोधकांनी आपला वेळ व्यर्थ घालवू नये, असा सल्ला गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी विरोधकांना दिला आहे. 

सरकार पाडण्याचा प्रयत्न पोलिस खात्यांकडून केला जात आहे, असे वक्तव्य गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून अधिकची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न पत्रकारांनी केला.

त्यावर मंत्री देसाई म्हणाले, यासंदर्भात माझी गृहमंत्री देशमुख यांच्याशी अद्याप चर्चा झालेली नाही. मी सध्या पाटण तालुक्यात कोविड सेंटर सुरू करण्याच्या कामात व्यस्त होते. मी स्वतः याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी चर्चा करून याची माहिती घेणार आहे. मुळात महाराष्ट्रात सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार एका भक्कम विचाराने बनले आहे.

शिवसेनेचे नेतृत्व असलेल्या या सरकारला दोन्ही काँग्रेसने भक्कम पाठिंबा दिलेला आहे. कोणी कसलाही प्रयत्न केला तरी हे महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे दोनशे टक्के पूर्ण करेल. तसेच पुढील दहा वर्षेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करेल. त्यामुळे विरोधकांनी आपला वेळ व्यर्थ वेळ घालवू नये.

सध्या महाविकास आघाडीचे सरकार कोविडचा संसर्ग रोखण्याच्या पार्श्वभूमीवर काम करत आहे. इतर कोणत्याही गोष्टीला आमचे प्राधान्य नाही. केवळ कोविड संसर्ग परतविणे महत्वाचे आहे. त्यामुळे त्यांनी कितीही
आदळआपट केली तरी किंचितसाही फरक या सरकारवर पडणार नाही. यासंदर्भात मी कॅबिनेट मंत्र्यांशी बोलणार असून अशा पोलिस अधिकाऱ्यांची नावे त्यांच्याकडे असतील तर ते त्याबाबत निर्णय घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख