खडसे समजुतदार, पक्ष सोडणार नाहीत : चंद्रकांत पाटील यांचा विश्‍वास  - Khadse understands, will not leave the party : BJP State President Chandrakant Patil's faith | Politics Marathi News - Sarkarnama

खडसे समजुतदार, पक्ष सोडणार नाहीत : चंद्रकांत पाटील यांचा विश्‍वास 

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 15 ऑक्टोबर 2020

खडसे हे अतिशय समजुतदार राजकारणी आहेत. आमच्यासाठी ते नेते आहेत. पक्षाची हानी होईल, अशी कोणतीही कृती ते करणार नाहीत. प्रसारमाध्यमातूनच या चर्चा सुरू आहेत. पण खडसे पक्ष सोडणार नाहीत. त्यांची नाराजगी दूर होईल. एक - दोन आठवड्यात सर्व काही सुरळीत होईल.' असा विश्‍वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

कोल्हापूर : एकनाथ खडसे यांना राजकीय जाण तर आहेच. पण ते समजुतदारही आहेत. त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. पक्षाची हानी होईल, अशी कोणतीही कृती ते करणार नाही. खडसे आमचे नेते आहेत ते पक्ष सोडणार नाहीत, असा विश्‍वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

माजी मंत्री एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या पाच वर्षांपासून खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात नाराजीनाट्य सुरू आहे. घटस्थापनेला खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करतील. सुरुवातीला त्यांच्याकडे पक्षाची जबाबदारी दिली जाईल. त्यानंतर त्यांना कृषी मंत्रीपद देण्यात येईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

याबाबत चंद्रकांत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, "एकनाथ खडसे आमचे नेते आहेत. राजकारणात प्रत्येकाची काही ना काही अपेक्षा असते. आपल्याला सन्मान मिळावा अशीही अपेक्षा असू शकते. खडसे यांच्याशी गेल्या गेल्या पाचवर्षांपासून माझी चर्चा सुरू आहे. काही वेळा आपल्याला जे
अपेक्षित असते, असे होतेच असे नाही.

पण खडसे हे अतिशय समजुतदार राजकारणी आहेत. आमच्यासाठी ते नेते आहेत. पक्षाची हानी होईल, अशी कोणतीही कृती ते करणार नाहीत. प्रसारमाध्यमातूनच या चर्चा सुरू आहेत. पण खडसे पक्ष सोडणार नाहीत. त्यांची नाराजगी दूर होईल. एक - दोन आठवड्यात सर्व काही सुरळीत
होईल.' असा विश्‍वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

बाप काढण्याची माझी संस्कृती नाही...
''बाप'' या शब्दावरून मराठी भाषेत काही वाक्‍य प्रचार, म्हणी आहेत. त्यांचा बोलताना उपयोग केला तर कोणाचा ''बाप'' काढला असा अर्थ होत नाही. पुणे महापालिकेत आमचे सदस्य अधिक आहेत. त्या अर्थाने मी ''बाप'' असा शब्दप्रयोग केला. अजित पवारांच्या वडिलांचा उल्लेख करण्याचा कोणताही हेतू नव्हता. बाप काढण्याची माझी संस्कृती नाही. केंद्रातील नेत्यांना कोणी ''बाप'' म्हणणारे आहे का? असे शशिकांत शिंदे म्हणाले, त्यांना देशातील 130 कोटी जनता बाप मानते, असे ही चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख