घातपातामुळे ग्रीडफेल्युअर थीअरीवर विश्वास ठेवायलाच हवा  : भातखळकरांकडून उर्जामंत्र्यांची खिल्ली

या ग्रीडफेल्युअरमागे घातपात आहे, असे विधान आज उर्जामंत्र्यांनी केले आहे. त्या विधानावर विश्वास ठेवावाच लागेल, मात्र या एवढ्या मोठ्या घातपाताची पुसटशी कल्पनाही राज्याच्या गृहखात्याला आली नाही. त्यामुळे प्रथम गृहमंत्री अनिल देशमुख यांनीच राजीनामा द्यावा, अशा शब्दांत भातखळकर यांनी मंत्र्यांची टर उडवली आहे.
 Gridfailure theory must be believed due to massacre: Power Minister mocks Bhatkhalkar
Gridfailure theory must be believed due to massacre: Power Minister mocks Bhatkhalkar

मुंबई : परवा महामुंबई परिसरात झालेले ग्रीडफेल्युअर हे घातपातामुळे झाले या उर्जामंत्री नितीन राऊत यांच्या विधानावर विश्वास ठेवायलाच हवा, अशा शब्दांत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी त्यांची खिल्ली उडवली आहे. कायम जातीय विचारांमुळे डोक्यात अंधार असलेले ग्रीडफेल मंत्री अशी बोचरी टीकाही त्यांनी केली आहे. 

या ग्रीडफेल्युअरमागे घातपात आहे, असे विधान उर्जामंत्र्यांनी केले आहे. त्या विधानावर विश्वास ठेवावाच लागेल, मात्र या एवढ्या मोठ्या घातपाताची पुसटशी कल्पनाही राज्याच्या गृहखात्याला आली नाही. त्यामुळे प्रथम गृहमंत्री अनिल देशमुख यांनीच राजीनामा द्यावा, अशा शब्दांत भातखळकर यांनी मंत्र्यांची टर उडवली आहे. 

ग्रीडफेल्युअर मागे घातपात या उर्जामंत्र्यांनीच सांगितल्याने त्यांच्या विधानावर विश्वास ठेवायलाच हवा. या घातपातामुळे दोघा जणांचे जीव गेले, लाखो लोकांचे प्रचंड हाल झाले, कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले, एवढी हानी या ग्रीडफेल्युअर मुळे झाली. त्यामुळे खरेतर या घातपाताची चौकशी करण्याआधीच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यायला हवा, अशी मागणीही भातखळकर यांनी केली आहे. 

मुळात या ग्रीडफेल्युअरमागे घातपात आहे हे उर्जामंत्र्यांना केव्हा कळले हा मुख्य प्रश्न आहे. त्यांना हे आधीच कळले असेल तर त्यांनी त्याची कल्पना त्यांनी गृहमंत्र्यांना दिली का, याचाही खुलासा राऊत यांनी केला पाहिजे, असेही भातखळकर यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com