नाराज अजित पवार राष्ट्रवादीला धक्का देणार : या नेत्याचा दावा

राष्ट्रवादी व काँग्रेसमध्ये बंडाळी उडण्याची शक्यता आहे. परिणामी या तीन पक्षाचे महाविकास आघाडी सरकारचे लवकरच विसर्जन होईल आणि महायुतीचे सरकार पुन्हा या राज्यात सत्तेवर आल्याशिवाय राहणार नाही, असेही मंत्री आठवले यांनी स्पष्ट केले.
Republican Party Minister Ramdas Athawale
Republican Party Minister Ramdas Athawale

मुंबई : पार्थ पवारांबाबत शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे कदाचित अजित पवार नाराज होण्याची शक्यता आहे. यातूनच ते महाविकास आघाडीच्या सरकारमधूनही बाहेर पडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. महाविकास आघाडीच्या या तिनही पक्षाच्या अंतर्गत वाद, बंडाळीमुळे या सरकारच्या भवितव्याचे काहीही खरे नाही. श्रीगणेश विसर्जनानंतर महाविकास आघाडी सरकारचे विसर्जन होईल, असे भाकित रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. 

आज बांद्रा येथील त्यांच्या  संविधान निवासस्थानी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आठवले म्हणाले, बॉलिवूड मधील निर्माते दिग्दर्शक कलाकार चांगले असले तरी काही प्रमाणात कलाकारांवर अन्याय होतो. अमिताभ बच्चन सारख्या कलाकाराला ही सुरुवातीला प्रचंड संघर्ष करावा लागला.

त्यानंतर ते बिग बी झाले. त्यामुळे सुशांत सिंह या कलाकारावर अन्याय झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे अभिनेता सुशांत सिंह रजपूतच्या आत्महत्येची चौकशी सीबीआयकडून व्हावी, अशी आम्ही मागणी केली होती. मुंबई पोलिसांचा जगात नावलौकिक आहे. त्यातुलनेत सुशांत सिंहच्या आत्महत्याप्रकरणी मुंबई पोलिसांचा तपास वेगवान झालेला नाही. त्यामुळे पार्थ पवार यांनी याप्रकरणी सीबीआय चौकशीची केलेली मागणी रास्त आहे.

यापूर्वीही अनेक प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली आहे. त्याचा अर्थ आमचा मुंबई पोलिसांवर विश्वास नाही, असा होत नाही. मुंबई पोलिसांवर आमचा विश्वास आहे. पण एखादे प्रकरण सीबीआय चौकशीसाठी द्यावे ही मागणी करणे म्हणजे मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखविणे, असा होत नाही. त्यामुळे सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, ही आमची मागणी आहे, असे श्री. आठवले यांनी स्पष्ट केले. 

मंत्री आठवले म्हणाले, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्याप्रमाणात नाराजी होणार आहे.या तिन्ही पक्षात अंतर्गत वाद आहेत. पार्थ पवारबाबत शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे कदाचित अजित पवार नाराज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते या सरकारमधून बाहेर पडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी गेले होते. त्यामुळे राष्ट्रवादी व काँग्रेसमध्ये बंडाळी उडण्याची शक्यता आहे. परिणामी या तीन पक्षाचे महाविकास आघाडी सरकारचे लवकरच विसर्जन होईल आणि महायुतीचे सरकार पुन्हा या राज्यात सत्तेवर आल्याशिवाय राहणार नाही, असेही मंत्री आठवले यांनी स्पष्ट केले. 


मोदी सरकार मजबूतच...
 संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकार पडण्याआधी केंद्र सरकार पडेल असे असंबंध विधान केले. सामना वृत्तपत्र चालविणे सोपे आहे, मात्र नरेंद्र मोदींशी सामना करणे त्यांना जमणार नाही. केंद्रातील मोदींच्या नेतृत्वातील एनडीए सरकार मजबूत बहुमत असणारे सरकार आहे. या सरकार ला 2024 पर्यंत धोका नाही तसेच 2024 च्या ही निवडणुका मोदी सरकार जिंकेल, असा विश्वास मंत्री आठवले यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com