कोरोना रूग्णांना दिलासा : रूग्‍णालयांनी उकळलेले ३३ लाख परत मिळणार - District Collector orders return of extra Rs 33 lakh taken from Corona victims | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोना रूग्णांना दिलासा : रूग्‍णालयांनी उकळलेले ३३ लाख परत मिळणार

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

सातारा जिल्ह्यातील विविध खासगी रूग्णालयांनी कोरोनाबाधित रुग्णांकडून नियमापेक्षा जास्त बिले आकारत वसुली केल्याच्या तक्रारी वारंवार येत होत्या. याबाबत साताऱ्याचे जिल्हाधिकारी सिंह यांनी ही बाब गांभीर्याने घेतली. तसेच तक्रार असलेल्या रुग्णांच्या बिलांची तपासणी करण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची पथके नेमली.

सातारा : कोरोना रुग्णांवर केलेल्या उपचारांतील बिलांबाबत जिल्हा प्रशासनाकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी याबाबत तपासणी पथके नेमली होती. या पथकांनी कोरोना बाधितांच्या बिलांची तपासणी केली. त्यामध्ये 122 रुग्णांकडून अवाजवी बिले घेतल्याचे निदर्शनास आले आहे.त्यामुळे रुग्णालयांनी उकळलेले तब्बल 33 लाख 94 हजार 856 रुपये संबंधित रुग्णांना परत करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. 

सातारा जिल्ह्यातील विविध खासगी रूग्णालयांनी कोरोनाबाधित रुग्णांकडून नियमापेक्षा जास्त बिले आकारत वसुली केल्याच्या तक्रारी वारंवार येत होत्या. याबाबत साताऱ्याचे जिल्हाधिकारी सिंह यांनी ही बाब गांभीर्याने घेतली. तसेच तक्रार असलेल्या रुग्णांच्या बिलांची तपासणी करण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची पथके नेमली.

या पथकांनी जिल्ह्यातील विविध खासगी रुग्णालयांनी उपचार घेऊन घरी गेलेल्या एक हजार 112 रुग्णांच्या बिलांची तपासणी केली. यामध्ये 122 कोरोनाबाधित रुग्णांकडून 96 लाख 10 हजार 770 रुपये आकारण्यात आले होते. या पथकाकडून 122 कोरोनाबाधितांच्या बिलांत जादा आकारण्यात आलेली तब्बल 33 लाख 94 हजार 856 इतकी रक्कम कमी करून ती परत करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता विविध खासगी रुग्णालयांत कोरोना आजारावर उपचार करण्यात येत आहेत. परंतु, या रुग्णालयांकडून रुग्णांना देण्यात येणारे बिल हे शासनाने निर्धारित केलेल्या दराप्रमाणे देण्यात येते की नाही, याची तपासणी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढून रुग्णालयनिहाय देयक तपासणी पथके तयार केली होती. 

त्यात नोडल अधिकारी व एका ऑडिटरचा त्यात समावेश होता. विविध रुग्णालयांनी 122 कोरोनाबाधितांकडून 96 लाख 10 हजार 770 रुपये आकारले होते. या पथकांनी बिलांची तपासणी केली. त्यात 33 लाख 94 हजार 856 रुपयांची बिले कमी करून 62 लाख 73 हजार 554 रुपये इतकेच उपचाराचे बिल करण्यात आले आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख