आरोग्यमंत्र्यांच्या बाटलीमध्ये मुख्यमंत्र्यांची औषध :  डॉ. विनय नातू

डॉ. नातू म्हणाले, केंद्र सरकारच्या कृषी सुधारणा विधेयकाला राज्यातील एका युवक संघटनेकडून विरोध होत आहे. तो पूर्णपणे चुकीचा आणि शेतकर्‍यांची दिशाभूल करणारा आहे. या विधेयकामुळे शेतकरी खर्‍या अर्थाने आत्मनिर्भर होणार आहे.शेतकर्‍यांना आपला शेतमाल कोणाला विकता येणार आहे.
Dr. vinay Natu and Minister Rajesh Tope
Dr. vinay Natu and Minister Rajesh Tope

चिपळूण : कोरोना काळात आरोग्यमंत्री राजेश टोपे प्रत्येक जिल्ह्यात जाऊन तेथील आरोग्य व्यवस्थेची पाहणी करायचे. त्याचे श्रेय राष्ट्रवादीला मिळत होते म्हणून मुख्यमंत्र्यांनी माझे कुटूंब माझी जबाबदारी हे अभियान सुरू केले. कोरोनाची साथ पसरल्यानंतर जे काम आरोग्य विभागातील यंत्रणेकडून सुरू होते तेच काम माझे कुटूंब माझी जबाबदारी या मोहीमेतून होत आहे. म्हणजे आरोग्यमंत्र्यांच्या बाटलीमध्ये मुख्यमंत्र्यांची औषध वाटली जात आहे. अशा शब्दात भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी ''माझे कुटूंब माझे अभियान'' या अभियानाची खिल्ली उडवली. 

केंद्र सरकारने आणलेले कृषी विधेयक शेतकर्‍यांच्या दृष्टीने हिताचे आहे. या विधेयकामुळे कृषी क्षेत्रात आणि शेतकर्‍यांमध्ये अमुलाग्र बदलणार होणार आहेत. असा दावाही त्यांनी केला. या विधेयकाला विरोध करणार्‍या युवा संघटनेत किती शेतकरी आहेत. असा टोलाही त्यांनी अप्रत्यक्षरित्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसला हाणला.

डॉ. नातू म्हणाले, केंद्र सरकारच्या कृषी सुधारणा विधेयकाला राज्यातील एका युवक संघटनेकडून विरोध होत आहे. तो पूर्णपणे चुकीचा आणि शेतकर्‍यांची दिशाभूल करणारा आहे. या विधेयकामुळे शेतकरी खर्‍या अर्थाने आत्मनिर्भर होणार आहे. शेतकर्‍यांना आपला शेतमाल कोणाला विकता येणार आहे. बाजार समित्यांचे अधिकार कमी होतील पण अस्तित्व नष्ट होणार नाही.

शेती क्षेत्रावर अवलंबून असलेल्या माथी कामगारांची गरज कालही होती उद्याही असणार आहे. हा कायदा कोकणच्या हिताचा आहे. केंद्रात कोकणचे प्रतिनिधीत्व करणार्‍यांनी तो व्यवस्थितपणे मांडायला हवा होता पण कालपर्यंत सत्तेत बसलेले आता विरोधात आहेत. त्यामुळे ते कदाचित ते या कायद्याचा अभ्यास करत असतील असा टोला त्यांनी खासदार विनायक राऊत यांना हाणला. रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. 

सरकारकडून योग्य नियोजन झाले नाही त्यामुळे कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. आरोग्य यंत्रणा हतबल झाली आहे पण जिल्ह्याकडे लक्ष देण्यासाठी पालकमंत्र्यांकडे वेळच नाही. त्यामुळे प्रतिपालकमंत्री जिल्ह्याचा कारभार पाहत आहेत. त्यांना कुणी आणि कोणते अधिकार दिले हे तरी स्पष्ट होऊदे. असा टोला त्यांनी उच्चशिक्षणमंत्री उदय सामंत यांना लगावला.

रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक घरा दोन मास्क आणि सॉनिटायरझरचे वाटप केले जाणार आहे. अशी घोषणा उदय सामंत यांनी केली. त्यावर डॉ. नातू म्हणाले, हा तर ठेकेदाराच्या भल्यासाठी घेतलेला निर्णय आहे. कामथे उपजिल्हा रूग्णालयाला जिल्हाधिकार्‍यांनी जिल्हा रुग्णालयाचा दर्जा दिला खरा पण त्यांना तो अधिकार आहे का ? जिल्ह्यात चार वरिष्ठ अधिकारी डॉक्टर आहेत. या अधिकार्‍यांचे टास्क फोर्स तयार करून कोरोनाबाबत तातडीचे निर्णय होणे गरजेचे असल्याचे मत डॉ. नातू यांनी व्यक्त केले. 

विधेयकाचे समर्थन.... 
केंद्र सरकारने आणलेल्या नवीन कामगार विधेयक कायद्याचे डॉ. नातू यांनी समर्थन केले. ते म्हणले, काळानूसार डिजीटलायझेशन आणि यांत्रिकीकरण झाले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष उद्योगासाठी लागणारी कामगारांची संख्या पूर्वीपेक्षा कमी झाली आहे. त्यामुळे हे विधेयक काळानूसार बदलण्यात आले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com