Center should reconsider onion export ban Says Co-operation Minister Balasaheb Patil | Sarkarnama

कांदा निर्यात बंदीचा केंद्राने फेरविचार करावा : सहकार मंत्री बाळासाहेब पाटील

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

मंत्री पाटील म्हणाले, ""देशातील एकूण कांदा उत्पादनाचा विचार केला, तर महाराष्ट्रात 75 टक्के कांद्याचे उत्पादन घेतले जाते. निर्यातीमध्ये सुद्धा जवळपास 80 टक्के कांदा हा राज्यातील शेतकऱ्यांचा असतो. त्यातच निर्यात बंदीच्या निर्णयामुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान होईल.

कऱ्हाड : केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाचा फेरविचार करावा. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषी मंत्री दादा भुसे यांच्याशी चर्चा करून केंद्र शासनाला कांदा निर्यात बंदी उठवावी, अशी विनंती करणार असल्याची माहिती सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. 

मंत्री पाटील म्हणाले, ""देशातील एकूण कांदा उत्पादनाचा विचार केला, तर महाराष्ट्रात 75 टक्के कांद्याचे उत्पादन घेतले जाते. निर्यातीमध्ये सुद्धा जवळपास 80 टक्के कांदा हा राज्यातील शेतकऱ्यांचा असतो. त्यातच निर्यात बंदीच्या निर्णयामुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान होईल.

खासदार शरद पवार यांनी सुद्धा काल केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन कांदा निर्यात बंदीसंदर्भात चर्चा केली. राज्यात विविध ठिकाणी आंदोलन सुरू झाली आहेत, लिलाव थांबले आहेत. केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने कांद्याच्या दरात घसरण सुरू झाली आहे.

त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. या सर्व बाबींचा विचार करून केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाचा फेरविचार करावा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादा भुसे यांच्याशी चर्चा करून केंद्र शासनाला कांदा निर्यात बंदी उठवावी, अशी विनंती करण्यात येईल.'' 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख