छात्रभारतीकडून शिक्षणमंत्र्यांना काळा कंदील - Black lantern from Chhatrabharati to Education Minister | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

छात्रभारतीकडून शिक्षणमंत्र्यांना काळा कंदील

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 14 नोव्हेंबर 2020

विनाअनुदानित धोरणामुळे अनेक शिक्षकांनी आत्महत्या केलेल्या असतानाही सरकार थोडेही संवेदनशील होत नाही, असे अनेक आरोप करत सरकारच्या अशा धोरणाचा व सरकारचा संघटनेतर्फे निषेध करण्यात आला.

धारावी : मागील 20 वर्षांपासून राज्य सरकारच्या विनाअनुदानित धोरणामुळे हजारो शिक्षक आत्महत्या करत आहेत; परंतु सरकारला अजूनही याबाबत गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. लॉकडाऊन काळात 60 हून अधिक शिक्षकांनी आत्महत्या केल्या; परंतु सरकारला विनाअनुदानित शिक्षकांचे काही सोयरसूतक नाही. सरकारने या प्रश्नी गांभीर्याने विचार करावा; अन्यथा शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करत सरकारचा निषेध म्हणून छात्रभारती संघटनेने शिक्षणमंत्र्यांना काळा आकाशकंदील पाठवला आहे.

राज्य सरकारकडून नेहमीच खोटी आश्वासने देण्यात येतात. शिक्षकांनी कितीतरी आंदोलने केली; परंतु सरकार खोटे आश्वासन देऊन समजूत काढत आहे. हा खेळ गेल्या 20 वर्षांपासून चालवत आहे.

शिक्षण देणे ही सरकारची जबाबदारी असून ते मोफतच दिले पाहिजे; परंतु सरकार राज्यातील कमी पटसंख्येच्या शाळा धडाधड बंद करत आहे. गोरगरिबांचे शिक्षण संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. विनाअनुदानित धोरणामुळे अनेक शिक्षकांनी आत्महत्या केलेल्या असतानाही सरकार थोडेही संवेदनशील होत नाही, असे अनेक आरोप करत सरकारच्या अशा धोरणाचा व सरकारचा संघटनेतर्फे निषेध करण्यात आला.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख