मी आलो म्हणजे शेतकऱ्यांना न्याय मिळणारच : प्रवीण दरेकर - BJP Leader Pravin Darekar Visited Affected Farms In Jawoli taluka With MLA Shivendraraje Bhosale | Politics Marathi News - Sarkarnama

मी आलो म्हणजे शेतकऱ्यांना न्याय मिळणारच : प्रवीण दरेकर

विजय सपकाळ
गुरुवार, 22 ऑक्टोबर 2020

प्रवीण दरेकर म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आहेत, ते बाळासाहेब ठाकरेंचे सुपूत्र आहेत. त्यामुळे ठाकरे सरकार निश्चित परभणीत दिलेला शब्द पाळतील. नुकसानग्रस्त कोरडवाहू शेतीसाठी २५ हजार, बागायती शेतीसाठी ५० हजार व फळबाग लागवडीसाठी एक लाख रूपये द्यावे.

मेढा : शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका. नुकसानीने अधिक चिंताग्रस्त, निराश होऊ नका, आम्ही तुम्हांला न्याय मिळवून देण्यासाठीच आलोय. या वेळेस शेतकऱ्यांना न्याय मिळणारच, असे आश्वासन जावळीतील शेतकऱ्यांना देऊन ठाकरे सरकारने प्रत्येक बाधित शेतकऱ्यांना सरसकट दहा ते १५ हजार रूपयांची तातडीची मदत द्यावी. अन्यथा, भारतीय जनता पक्ष रस्त्यावर उतरेल. त्यामुळे होणाऱ्या परिणामाला महाविकास आघाडीचे सरकार जबाबदार राहिल, अशा इशाराही विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी दिला.

श्री. दरेकर यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजेंसोबत जावळी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पहाणी केली. परतीच्या पावसात झालेल्या अतिवृष्टीत जावळी तालुक्यात झालेल्या पिक नुकसानीचे पाहणी करण्यासाठी तालुक्यातील रिटकवली व बिभवी गावांमध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांच्या नुकसानीची पहाणी केली.

त्यांनी स्वतः भुईमागाचा डाहाळा उपटून प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांची गाऱ्हांनी ऐकून शेतकरी बांधवांनो तुम्हांला जास्तीत जास्त भरपाईचा भरीव निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीन, असे आश्वासन दिले. ठाकरे सरकारने प्रत्येक बाधित शेतकऱ्यांना सरसकट दहा ते १५ हजार रूपये तातडीची मदत द्यावी. अन्यथा, भारतीय जनता पक्ष रस्त्यावर उतरेल. त्यामुळे होणाऱ्या परिणामाला महाविकास आघाडीचे सरकार जबाबदार राहिल, अशा इशाराही त्यांनी दिला. 

यावेळी त्यांच्यासोबत प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसिलदार  राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी सतिश बुध्दे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत, उपविभागीय कृषी अधिकारी चंदकांत गोरड, तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख, सरपंच रिटकवली सचिन दळवी, बिभवीच्या सरपंच जयश्री जाधव, आदी उपस्थित होते. प्रारंभी रिटकवली येथील बाधित शेतकरी महेश मर्ढेकर यांच्या भुईमुग पिकाची पाहणी त्यांनी केली. त्यानंतर तालुक्याचे प्रमुख पिक असलेल्या भात शेतीची बिभवी व रिटकवली येथे पाहणी केली.

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जावळी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांची माहिती दिली. या बाधित सर्वच शेतक्यांना अधिकाधिक मदत मिळवून देण्याची मागणी केली. प्रवीण दरेकर म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आहेत, ते बाळासाहेब ठाकरेंचे सुपूत्र आहेत. त्यामुळे ठाकरे सरकार निश्चित परभणीत दिलेला शब्द पाळतील. नुकसानग्रस्त कोरडवाहू शेतीसाठी २५ हजार, बागायती शेतीसाठी ५० हजार व फळबाग लागवडीसाठी एक लाख रूपये द्यावे.

त्यांनी दिलेला शब्द पाळावा.  अन्यथा, राज्यभर भारतीय जनता पक्ष जनआंदोलन उभारेल, मग ते मदत मिळाल्याशिवाय गप्प बसणार नाही. 
शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका. नुकसानीने अधिक चिंताग्रस्त, निराश होऊ नका, आम्ही तुम्हांला न्याय मिळवून देण्यासाठीच आलोय. या वेळेस शेतकऱ्यांना न्याय मिळणारच, असे आश्वासन श्री. दरेकर यांनी दिले. 

गेल्या घरी सुखी रहा.....
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पक्ष सोडून गेले तरी याचा पक्षावर काहीही परीणाम होणार नाही. त्यांना शुभेच्छा ! पक्षासाठी त्यांचे योगदान मोठे असले तरी पक्षानेही त्यांना सर्वकाही दिले. व्यक्तिदोष हे निमित्त मात्र, त्यांना जायचे होते ते गेले. त्यांना शुभेच्छा ! गेल्या घरी सुखी राहा.
 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख