कंगनासाठी आठवलेंची राज्यपालांकडे धाव   - Athavale Meet to the governor for Kangana | Politics Marathi News - Sarkarnama

कंगनासाठी आठवलेंची राज्यपालांकडे धाव  

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 11 सप्टेंबर 2020

कोझिकोड येथे विमान अपघातात मृत्यू झालेले कॅप्टन दीपक साठे यांनी जीवाची पर्वा न करता अनेक प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत. त्यांना मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला पाहिजे, अशी मागणीही मंत्री आठवले यांनी राज्यपालांकडे केली आहे. 

मुंबई : मुंबई महानगरपालिकेने अभिनेत्री कंगना राणावत यांच्या कार्यालयावर नियमाचे उल्लंघन करून तोडक कारवाई केली आहे. या कारवाईमुळे कंगनावर अन्याय
झाला असून त्यांना त्याची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. तसेच ज्या अधिकाऱ्यांनी त्यांचे कार्यालय तोडले त्यांच्यावरही कारवाई करून कंगनाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे.  

मुंबई महानगरपालिकेने अभिनेत्री कंगना रानावत यांच्या कार्यालयावर तोडक कारवाई केली. या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले
यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली.

मुंबई मनपाने अभिनेत्री कंगना राणावतच्या कार्यालयावर 24 तासाची नोटीस देऊन तोडक कारवाई केली आहे. त्यांनी नियमाचे उल्लंघन करून त्यांच्यावर अन्याय
केला आहे. त्यामुळे कंगनाला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. तसेच ज्या अधिकाऱ्यांनी कंगनाच्या कार्यालयावर तोडक कारवाई केली. त्यांच्यावर कारवाई करून
तिला न्याय मिळवून दिला पाहिजे, अशी विनंती राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली. 

तसेच कोरोनाला रोखण्यास महाविकास आघाडी सरकारला अपयश आले आहे. राज्य सरकारने कोरोनासाठी कठोर पावले उचलावित, असे आदेश देण्याचीही मागणी श्री.
आठवले यांनी राज्यपालांकडे केली. कोझिकोड येथे विमान अपघातात मृत्यू झालेले कॅप्टन दीपक साठे यांनी जीवाची पर्वा न करता अनेक प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत. त्यांना मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला पाहिजे, अशी मागणीही मंत्री आठवले यांनी राज्यपालांकडे केली आहे. 
 

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख