साताऱ्याच्या हद्दवाढीचे पत्र अजितदादांनी शिवेंद्रसिंहराजेंच्या हातात दिले - Ajit Pawar handed over the letter of demarcation of Satara to Shivendraraje : | Politics Marathi News - Sarkarnama

साताऱ्याच्या हद्दवाढीचे पत्र अजितदादांनी शिवेंद्रसिंहराजेंच्या हातात दिले

उमेश बांबरे 
मंगळवार, 8 सप्टेंबर 2020

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे हद्दवाढीचा प्रस्ताव सुपूर्द केला. या हद्दवाढीत करंजे, खेड, दरे खुर्द, कोडोली, गोडोली असा परिसरचा सातारा पालिकेच्या हद्दीत समावेश झाला आहे. खेड व कोडोली परिसरातील महामार्गाच्या पश्चिमेकडील क्षेत्राचा समावेश झाला आहे. 

सातारा : सातारा शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न निकाली निघाला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रस्तावास मंजूरी दिली आहे. १९७१ पासून प्रलंबित असलेला हद्दवाढीचा प्रश्न भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा पाठपुराव्यामुळे मार्गी लागला आहे. याबाबतचे पत्र आज अजित पवार यांनी शिवेंद्रसिंहराजेंच्या हातात दिले. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे हद्दवाढीचा प्रस्ताव सुपूर्द केला. या हद्दवाढीत करंजे, खेड, दरे खुर्द, कोडोली, गोडोली असा परिसरचा सातारा पालिकेच्या हद्दीत समावेश झाला आहे. खेड व कोडोली परिसरातील महामार्गाच्या पश्चिमेकडील क्षेत्राचा समावेश झाला आहे. 

गेल्या अनेक वर्षांपासूनच्या आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या प्रयत्नांना यश आले आहे. सातारच्या हद्दवाढीवर शिक्का मोर्तब झाले आहे. तत्कालिन  सहकार मंत्री कै.अभयसिंहराजे भोसले यांनी शाहूनगरीच्या विकासासाठी पाहिलेले स्वप्न त्यांचे चिरंजीव आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या माध्यमातून पूर्ण झाले आहे. १९७१ पासून प्रलंबित असलेल्या सातारच्या हाद्दवाढीचा प्रश्न आजअखेर शिवेंद्रसिंहराजेंनी सोडवला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख