सातारा : त्यांचा गाढा अभ्यास आहे, मी मान्य करतो. मला अभ्यास कमी असला तरी कॉमनसेन्स का कॉमन आहे. मला मराठा आरक्षणाबाबत अजिबात काहीही अभ्यास नाही. पण मला तुमच्या सारख्या तज्ञ लोकांकडून जाणून घ्यायचे आहे. नेमके काय घडले, त्याचे उत्तर द्या. माझा अभ्यास असता तर मग....जे इतर अनेकांनी केले तसेच मी पण केले असते, असे प्रतिउत्तर साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी श्री. भुजबळ यांना दिले आहे.
मराठा आरक्षणाबाबत उदयनराजे भोसले यांचा अभ्यास नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केली होती. त्यावर खासदार उदयनराजेंनी आज त्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. उदयनराजे म्हणाले, मराठा आरक्षणावर त्यांचा गाढा अभ्यास आहे, मी मान्य करतो. मला अभ्यास कमी असला तरी कॉमन सेन्स का कॉमन आहे. हे मलाही माहिती नाही. मला मराठा आरक्षणाबाबत अजिबात काहीही अभ्यास नाही.
पण मला तुमच्या सारख्या तज्ञ लोकांकडून जाणून घ्यायचे आहे. नेमके काय घडले ते. त्याचे उत्तर द्या. ते वयाने मोठे आहेत, त्यांनी काहीही बोलले तरी मी त्याकडे लक्ष देत नाहीत, असे सांगून उदयनराजे म्हणाले, मराठा आरक्षण प्रश्नावरून पहिल्यापासून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. मराठा आरक्षणाबाबत अभ्यासाचा प्रश्न येतोच कुठे येतो. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे.
आम्ही इतरांचे काढून द्या, असे म्हटलेले नाही. पण माझी बुध्दी काढणाऱ्यांकडून जाणून घ्यायचे की नेमके काय घडले. त्याचे उत्तर द्या. विषय डायव्हर्रट करू नका. कोणाला काय पाहिजे ते द्या यामध्ये अभ्यासाचा प्रश्न येतोय कुठे. अभ्यास असता तर.... इतर अनेकांनी जे केले तसे मला करता आले असते, असा सूचक इशाराही उदयनराजेंनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना दिला.

