यावल पालिकेचे मुख्याधिकारी २८ हजारांची लाच घेताना पकडले - Yaval Municipal Corporation chief caught taking bribe of Rs 28,000 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

भाजपचे किरीट सोमय्या अखेर महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरला रवाना
चरणजीत चन्नी होणार पंजाबचे नवे मुख्यमंत्री राज्याचे प्रभारी हरीश रावत यांची घोषणा
गणेशोत्सव विसर्जनामुळे पुण्यात मध्यवर्ती भागातील रस्ते वाहतुकीसाठी बंद
अंबिका सोनी यांनी पंजाबचे मुख्यमंत्रीपद नाकारले
पुरग्रस्तांसाठी सरकारची महत्वाची घोषणा ; नव्या निकषानुसार मदत

यावल पालिकेचे मुख्याधिकारी २८ हजारांची लाच घेताना पकडले

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 31 जुलै 2021

मुख्याधिकारी बबन तडवी हे १० ऑगष्ट २०१९ला येथे रुजू झाल्यापासून ते वादातीत होते.

जळगाव : जळगाव जिल्हयातील यावल येथील पालिकेचे मुख्याधिकारी बबन गंभीर तडवी यांना रस्ता काँक्रीटीकरण कामाची वर्कऑर्डर मिळण्यासाठी ठेकेदाराकडून २८ हजार रुपये लाच स्विकारतांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही घटना शुक्रवारी (ता.३०) दुपारी एकच्या सुमारास घडली आहे.  Yaval Municipal Corporation chief caught taking bribe of Rs 28,000

यावल येथील पालिकेमार्फत शहरात वाणी गल्लीत रस्ता काँक्रीटीकरण कामाची वर्कऑर्डर मिळण्यासाठी व साठवण तलावाच्या देयकापोटी जळगाव येथील ठेकेदारास मुख्याधिकारी बबन तडवी याने साडेसात लाखाची लाच मागितली होती. दरम्यान, यातील २८ हजार रुपयांचा पहिल्या हप्त्याची लाच आज देण्याचे ठरले होते. Yaval Municipal Corporation chief caught taking bribe of Rs 28,000

हेही वाचा : रस्त्याच्या कामाची मुदत संपली, ठेकेदाराला ठोठावला सव्वा कोटींचा दंड

त्यानुसार मुख्याधिकारी बबन तडवी यांच्या दालनात संबंधित ठेकेदाराकहून २८ हजार रुपयांची लाच घेतांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने श्री. तडवी यांना रंगेहाथ पकडले. मुख्याधिकारी बबन तडवी हे १० ऑगष्ट २०१९ला येथे रुजू झाल्यापासून ते वादातीत होते.

आवश्य वाचा : खासदाराच्या चौकशीसाठी पोलिसांनी ठोठावला संसदेचा दरवाजा

पालिकेचे बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता सईद शेख यांना निलंबित न करण्यासाठी, सेवानिवृत्त कर्मचारी अशोक चव्हाण यांच्या पगारी रजा कालावधीचा पगार देण्यासाठी पैशांची मागणी, कोरोना काळात पालिकेचे कर्मचारी सूर्यकांत पाटील यांचे निधन झाले होते. शासनाकडून त्यांच्या निधनाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविण्यासाठी देखील पैशांची मागणी, तसेच प्रत्येक लहान मोठया ठेकेदारांकडून मुख्याधिकारी पैशांची मागणी करीत असल्याचा आरोप आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख