केंद्राचे विषय राज्याकडे ढकलण्याचे भाजपच्या नेत्यांचे काम.... - The work of BJP leaders to push the issues of the Center to the state says Minister Shambhuraj Desai | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

केंद्राचे विषय राज्याकडे ढकलण्याचे भाजपच्या नेत्यांचे काम....

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 24 जून 2021

केंद्र सरकारकडे असलेले विषय राज्याच्या गळी उतरवायचे काम भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडुन सुरु आहे, हे बरोबर नाही. जे विषय राज्याच्या आख्यारीत आहेत ते राज्य करेल. 

कऱ्हाड : महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासुन भाजपचे सर्वच नेते हे सरकार कोसळण्याचे स्वप्न बघत आहेत. हे सरकार दीड वर्षे भक्कमपणाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. केंद्र सरकारकडे असलेले विषय राज्याकडे ढकलण्याचे काम भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडुन सुरु आहे, हे बरोबर नाही, असे मत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले. The work of BJP leaders to push the issues of the Center to the state ....

ओबीसी आरक्षणासंदर्भात भाजपच्या नेत्यांनी सुरु केलेल्या  आंदोलनासंदर्भात गृहराज्यमंत्री देसाई म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासुन भाजपचे सर्वच नेते हे सरकार कोसळण्याचे स्वप्न बघत आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार दीड वर्षे भक्कमपणाने कार्यरत आहे.

हेही वाचा : तृतीयपंथीयांच्या हक्कांसाठी सरसावल्या विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा

केंद्र सरकारकडे असलेले विषय राज्याच्या गळी उतरवायचे काम भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडुन सुरु आहे, हे बरोबर नाही. जे विषय राज्याच्या आख्यारीत आहेत ते राज्य करेल. मात्र केंद्राचे विषय भाजपच्या नेत्यांनी केंद्र सरकारकडुन मार्गी लावुन घ्यावे. आमदार विनायक मेटे यांच्या संरक्षणाबाबत मंत्री देसाई म्हणाले, राज्यातील लोकप्रतिनिधींना सुरक्षा देण्यासंदर्भात राज्यात एक समिती आहे.

आवश्य वाचा ं: महापालिकेवर भगव्याशिवाय दुसरा कुठलाच झेंडा फडकू शकत नाही, एमआयएमने स्वप्न पाहू नये..

त्या समितीच्या अहवालानुसार लोकप्रतिनिधींना संरक्षण देण्यात येते. आमदार विनायक मेटे यांनी संरक्षण मुंबईत दिले गेले बाहेर दिले गेले नाही हा त्या समितीचा निर्णय आहे. आमदार मेटे यांना जर धोका आहे, असे समितीच्या निदर्शनास आले तर संबंधित समितीच्या शिफारशीनुसार त्यांना तातडीने गृह विभागाकडुन संरक्षण देण्यात येईल.

नरेंद्र पाटलांनी कायदा हातात घेऊ नये 

मराठा आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी राज्य सरकारतर्फे जे करावे लागेल त्यासाठी महाविकास आघाडी सरकार तयार आहे. खासदार संभाजीराजे यांनी कोल्हापुरला मुक आंदोलन केले. त्याच दखल घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना तातडीने चर्चेला बोलवले. त्यातील शासनस्तरावरील जे तातडीने मान्य करता येणे होते ते धोरण सरकारने घेतले आहे. मात्र तरीही नरेंद्र पाटील हे हिंसक आंदोलन करणार असतील तर कोणीही कायदा हातात घेऊ नये. कायदा हातात घेवुन कोणीही आंदोलन करुन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कोणीही निर्माण करु नये.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख