पुणे पदवीधरमधून सारंग पाटील यांची माघार 

त्या सगळ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेत आहे. त्यामुळे पक्षाचा कार्यकर्ता म्हणून पक्ष ज्यांना उमेदवारी देईल. त्या उमेदावाराला निवडुन आणण्याची जबाबदारी माझी राहिल, असेही सारंग पाटील यांनी स्पष्ट केले.
Sarang Srinivas Patil
Sarang Srinivas Patil

कऱ्हाड : खासदार श्रीनिवास पाटील यांचे चिरंजीव व राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून यापुढे पूर्णवेळ काम करण्यासाठी आपण पुणे पदवीधर मतदारसंघातून माघार घेत असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते सारंग पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

सारंग पाटील यांनी आज झूम ॲपव्दारे पत्रकारांशी संवाद साधत आपला निर्णय जाहीर केला. नारायण गावपासून अक्कोलकोट ते पुन्हा कोल्हापूर अशा तब्बल 500 किलोमीटरच्या परिसरात विस्तारलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून सारंग पाटील यांचे नाव अव्वलस्थानी होते. 

2014 मध्ये झालेल्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत त्यांचे केवळ 2500 मतांनी पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी पुन्हा त्याच मतदारसंघातून तयारी सुरू ठेवली होती. आज अचानक श्री. पाटील यांनी या मतदारसंघातून माघार घेत असल्याचे जाहीर केले आहे. श्री. पाटील म्हणाले, पुणे पदवीधर मतदारसंघात उच्चांकी मतदार नोंदणी केली होती.

ऑफलाईन व ऑनलाईननोंदणीत आपणच अव्वल क्रमांकावर आहोत. सध्या तीन लाख 12 हजार मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये 62 हजार मतदारांची
नोंदणी केलेली आहे. वास्तविक ही नोंदणी मागील नोंदणीपेक्षा चांगली आहे. पाच जिल्ह्यातील 58 मतदारसंघातील मतदारांचा समावेश आहे. अशी स्थिती असताना केवळ सद्सद विवेक बुद्धीला स्मरून पुणे पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी माघार घेत आहे.

त्याबाबत 10 जुलै रोजीच निर्णय झाला आहे. त्याची माहिती पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही कळविलेली आहे. कोरोनाची स्थिती पाहता अधिक काळ ताटकळत राहण्यापेक्षा सातारा जिल्ह्यातील नागरीकांनी खासदार पाटील यांच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ करण्यासाठी त्यांचा मुलगा व राष्ट्रवादीचा पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहणार आहे. 

श्री. पाटील म्हणाले, फेब्रुवारीपासून कोरोनामुळे स्थिती अत्यंत बिकट आहे. त्या स्थितीचा विचार करून निर्णय घेत आहोत. जून अखेरीस होणाऱ्या निवडणुकीबाबत अद्यापही काहाही निर्णय झालेला नाही. त्यामुळे त्यात अधिक गुंतून राहण्यापेक्षा सातारा जिल्ह्यात कार्यरत राहणेच योग्य वाटते. निवडणुकीत माघार घ्यावी, यासाठी पक्षातून कोणताही दबाव नाही. कोणीही सांगितलेले नाही.

किंबहुना पक्षात पुणे पदवीधरबाबत कसलीच चर्चा नाही. त्यामुळे पूर्ण विचार करून निर्णय घेत आहे. मी घेतलेला निर्णय पक्षाला कळवून उमेदवारी न देण्याची विनंतीही केली आहे. मात्र, राष्ट्रवादीतून ज्यांना पुणे पदवीधरचा मतदारसंघाचा उमेदवार म्हणून जाहीर केले जाईल. त्यांच्या मागे खंबीरपणे उभा राहण्याची भुमिका मी घेणार आहे. माझ्यासोबत पाचही जिल्ह्यात ज्या लोकांनी काम केले आहे.

त्या सगळ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेत आहे. त्यामुळे पक्षाचा कार्यकर्ता म्हणून पक्ष ज्यांना उमेदवारी देईल. त्या उमेदावाराला निवडुन आणण्याची जबाबदारी माझी राहिल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com