मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्यासाठी प्रयत्न करणार : शरद पवार - Will try to lift the moratorium on Maratha reservation says MP Sharad Pawar | Politics Marathi News - Sarkarnama

मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्यासाठी प्रयत्न करणार : शरद पवार

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 17 डिसेंबर 2020

मराठा समाजास आरक्षण मिळावे, यासाठी मी गेली अनेक वर्षे प्रयत्न करीत आहे. परंतु वारंवार अडचणी येत आहेत, असे श्री. पवार यांनी समन्वयकांशी चर्चा करताना सांगितले. दरम्यान उच्च न्यायालयातील आरक्षणावरील स्थगिती उठविण्यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचेही पवार यांनी नमूद केले. 

सातारा : मराठा आरक्षणावर उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी येथे आज (गुरुवार) मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना सांगितले. 

श्री. पवार हे रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलच्या बैठकीस आज साता-यात आले होते. या बैठकीनंतर पवार यांची मराठा क्रांती मोर्चाच्या काही संघटना, संस्था प्रतिनिधींनी भेट घेतली. उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिली आहे. ते उठविण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या सातारा जिल्हा समन्वयकांनी श्री. पवार यांच्याकडे केली.

त्यावेळी मराठा समाजास आरक्षण मिळावे, यासाठी मी गेली अनेक वर्षे प्रयत्न करीत आहे. परंतु वारंवार अडचणी येत आहेत, असे श्री. पवार यांनी समन्वयकांशी चर्चा करताना सांगितले. दरम्यान उच्च न्यायालयातील आरक्षणावरील स्थगिती उठविण्यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचेही पवार यांनी नमूद केले. 

श्री. पवार यांच्यासोबत मराठा आरक्षणाबाबत प्रदीर्घ चर्चा झाली. त्यांनी स्थगिती उठविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्‍वास आम्हांला दिल्याचे समन्वयकांनी सरकारनामाशी बोलताना सांगितले. यावेळी मराठा क्रांती मोर्चा राजेंद्र क्षीरसागर, बंडूअण्णा कदम, ॲड. उमेश शिर्के, संदीप पोळ आदी उपस्थित होते.
 

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख