मग संजय राऊत राज्य सरकारवर खटला भरणार का : चित्रा वाघ यांचा सवाल - Will Sanjay Raut file a case against the state government: Chitra Wagh's question | Politics Marathi News - Sarkarnama

मग संजय राऊत राज्य सरकारवर खटला भरणार का : चित्रा वाघ यांचा सवाल

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 21 जुलै 2021

चुकीची माहिती कोणी संपादकांना देत असेल तर त्याची जबाबदारी कोणावर निश्चित करणार असा ही प्रश्न सौ. वाघ यांनी उपस्थित केला आहे. 

मुंबई : ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू झाला नसल्याच्या केंद्र सरकारच्या उत्तरावर खासदार संजय राऊतांनी केंद्रावर खटला भरावा, असे वक्तव्य केले होते. याचा समाचार घेताना भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी मे महिन्यात महाराष्ट्र सरकारने उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ऑक्सिजन अभावी राज्यात एकही मृत्यू झाला नसल्याचे म्हटलं आहे. मग संजय राऊत राज्य सरकारवर खटला भरणार का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. Will Sanjay Raut file a case against the state government: Chitra Wagh's question 

चित्रा वाघ म्हणाल्या, संजय राऊत यांना शब्द सुचत नाही, असे कानावर आलंय. केंद्र सरकारने ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू झालेला नाही, असं उत्तर दिल्याने केंद्रावर खटला भरावा, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचं म्हणणं आहे. मग आम्हालाही काही प्रश्न पडलेत. महाराष्ट्र सरकारने मे महिन्यात उच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र सादर केलेले आहे. 

हेही वाचा : ओबीसी आरक्षण पूर्ववत होईपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही

त्यामध्ये ऑक्सिजन अभावी राज्यात एकही मृत्यू झाला नसल्याचे म्हटलं आहे. मग संजय राऊत राज्य सरकारवर खटला भरणार आहेत का, असा प्रश्न चित्रा वाघ यांची उपस्थित केला आहे. आतापर्यंत ऑक्सिजन अभावी किती मृत्यू झालेत याची माहिती राज्य सरकारने केंद्र सरकारला दिलीय का, किंवा ते देणार आहेत का. चुकीची माहिती कोणी संपादकांना देत असेल तर त्याची जबाबदारी कोणावर निश्चित करणार असा ही प्रश्न सौ. वाघ यांनी उपस्थित केला आहे. 

आवश्य वाचा : राजस्थानमध्ये पंजाब फॉर्म्युला...सिद्धू यांच्याप्रमाणेच पायलट यांना प्रदेशाध्यक्षपद?

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख