विलासकाकांच्या वारसाला मिळणार का जिल्हा बँकेत एंट्री...

काँग्रेसच्या नेत्यांनी या निवडणूकीत तटस्थ भूमिका घेऊन ॲड.उदयसिंह पाटलांसाठी आग्रही भूमिका घेतल्यास काकांचा वारसदार म्हणून त्यांची बँकेत एंट्री होऊ शकणार आहे.
विलासकाकांच्या वारसाला मिळणार का जिल्हा बँकेत एंट्री...
Will the inheritance of Vilaskaka get entry in the Satara District bank ...

सातारा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याची भूमिका राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी घेतली आहे. पण माजी आमदार कै. विलासराव पाटील उंडाळकर (काका) यांच्या निधनानंतर प्रथमच होणाऱ्या बँकेच्या या निवडणुकीत त्यांचे सुपूत्र ॲड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांना सामावून घेतले जाणार का, याची उत्सुकता आहे. कराड सोसायटी मतदारसंघातून पालकमंत्री बाळासाहेब पाटील इच्छुक असून त्यांनी ठराव ही केले आहेत. त्यामुळे उदयसिंह पाटलांना सोसायटी गटातून निवडून येणे अडचणीचे ठरणार आहे. परिणामी काकांचा वारसदार जिल्हा बँकेत दिसणार का हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. Will the inheritance of Vilaskaka get entry in the Satara District bank ...

सातारा जिल्हा बँकेची जडणघडण यशवंतराव चव्हाण, किसन वीर, राजारामबापू पाटील, रघुनाथराव पाटील, बाळासाहेब देसाई यांचा मोठा वाटा आहे. किसन वीरांनंतर बँकेची धुरा तत्कालिन काँग्रेस आमदार विलासराव पाटील उंडाळकर यांनी संभाळली. त्यांची शिस्त व योग्य नियोजन यामुळे बँकेचा वटवृक्ष झाला. त्यांच्याकडून राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी बँक ताब्यात घेतली. तरीही संचालक म्हणून विलासराव पाटील उंडाळकर बँकेत अगदी शेवटच्या क्षणापर्यंत राहिले. त्यांच्यानंतर बँकेत त्यांच्या वारसाला स्थान मिळावे, अशी सर्वांचीच इच्छा आहे.

पण कोरोनाच्या संसर्गामुळे केलेल्या लॉकडाउनमुळे बँकेच्या विद्यमान
संचालकांना तब्बल १५ महिने मुदतवाढ मिळाली. आता कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने निवडणूक प्रक्रिया होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत. सहकार विभागाने येत्या आठवडाभरात निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याची तयारी केली आहे. त्यामुळे राजकिय हालचालींना वेग आला आहे.

काकांनी जिल्हा बँकेत दिलेल्या योगदानाची दखल घेऊन राष्ट्रवादीचे नेते काकांच्या वारसाला जिल्हा बँकेत स्थान देतील, अशी आशा वाटत आहे. पण, सध्याची परिस्थिती पाहता हे सहज शक्य नाही. कराड सोसायटी मतदारसंघातून पालकमंत्री तथा सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नावाचेही जिल्हा बँकेला ठराव झालेले आहेत. तसेच काकांचे सुपूत्र ॲड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या नावाने ही ठराव करण्यात आले आहेत.पण, जिंकण्या इतके ठराव उदयसिंह पाटलांकडे नसल्याने पालकमंत्री या मतदारसंघातून जिल्हा बँकेवर थेट निवडून येऊ शकतात.

अशावेळी इतर कोणत्यातरी मतदारसंघातून काकांच्या मुलाला बँकेवर घेणे गरजेचे आहे. पण राष्ट्रवादीचे नेते यासाठी इ्च्छुक नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी या निवडणूकीत तटस्थ भूमिका घेऊन ॲड.
उदयसिंह पाटलांसाठी आग्रही भूमिका घेतल्यास काकांचा वारसदार म्हणून त्यांची बँकेत एंट्री होऊ शकणार आहे. राष्ट्रवादीकडून यावेळेस सर्वसमावेश पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक बिनविरोधचे मनसुभे आहेत. त्यामध्ये ॲड. उदयसिंह पाटलांचा समावेश होणार का, यावर त्यांची जिल्हा बँकेतील एंट्री स्पष्ट होणार आहे. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in