उद्धव व फडणवीस यांच्यात काय चर्चा झाली? : रामदास आठवलेंनी दिले हे उत्तर

मोदींविरोधात कोणी कितीही कट कारस्थान केले तरी मोदींना कोणीही अडवून शकत नाही. आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत देशात पुन्हा भाजप व रिपब्लिकन पक्षाचेच सरकार सत्तेत येईल, असे भाकित त्यांनी केले.
उद्धव व फडणवीस यांच्यात काय चर्चा झाली? : रामदास आठवलेंनी दिले हे उत्तर
What was the discussion between Uddhav and Fadnavis? : This is the answer given by Ramdas Athavale

सातारा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीत एकत्र येण्यासंदर्भातही चर्चा होऊन पाच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपद भाजपला द्यावे यापध्दतीची चर्चा झाली असेल. शिवसेना व भाजप एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याचा प्रयोग होत असेल तर त्याचा विचार उद्धव ठाकरे यांनी करावा, असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय  व विशेष सहाय्य राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे. What was the discussion between Uddhav and Fadnavis? : This is the answer given by Ramdas Athavale

दरम्यान, मोदींविरोधात कोणी कितीही कट कारस्थान केले तरी मोदींना कोणीही अडवून शकत नाही. आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत देशात पुन्हा भाजप व रिपब्लिकन पक्षाचेच सरकार सत्तेत येईल, असे भाकित त्यांनी केले. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले आज जिल्ह्यातील अतिवृष्टी भागाची पहाणी व आपत्तीग्रस्तांना मदत वाटपासाठी साताऱ्यात आले होते. यापूर्वी त्यांनी येथील शासकिय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, किशोर गालफाडे, आण्णा वायदंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

श्री. आठवले म्हणाले, सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीत नुकसान झालेल्या कुटुंबांचे अद्यापपर्यंत पूनर्वसन झालेले नाही. या सर्वांचे संपूर्ण पूनर्वसन होण्यासाठी दोन वर्षे लागतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. पण ज्यांना तात्पुरत्या जागेत ठेवले आहे, त्यांचे तातडीने चांगल्या ठिकाणी पूनर्वसन करावे, तसेच शासनाने जाहीर केल्याप्रमाणे मदत द्यावी. ओबीसी आरक्षणाबाबत ते म्हणाले, ओबीसीं राजकिय आरक्षण मिळेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेऊ नयेत. या संस्थांत ओबीसींच्या जागा आरक्षित होणे गरजेचे आहे.

ओबीसींच्या राजकिय आरक्षणाबाबत काल सह्याद्री अतिथीगृहात सर्वपक्षिय बैठक राज्य सरकारने आयोजित केली होती. या बैठकीस सर्वपक्षिय नेत्यांना निमंत्रित केले होते. मात्र, रिपब्लिकन पक्षाला निमंत्रण नव्हते. याबद्दल श्री. आठवले यांनी नाराजी व्यक्त करून ते म्हणाले, आमच्या पक्षाला यांनी यादीतून आऊट केलंय का. एकेकाळी शिवशक्ती, भीमशक्तीच्या प्रयोगातून आपण एकत्र आलो होतो. आता त्यांच्यासोबत आम्ही गेलो नाही म्हणून आम्हाला बैठकीला बोलावले नाही का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

मराठा आरक्षणाविषयी ते म्हणाले, मराठा समाजालाही आरक्षण मिळायला हवे पण राज्य सरकारने मराठा समाजाची निट बाजू न्यायालयात मांडली नाही. आठ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या मराठा समाजाला आरक्षण द्यावे, हे न्यायालयात सरकारला पटवून देता आलेले नाही. मागासवर्गीय कोणाला ठरवायचे याचा अधिकार आता राज्य सरकारला आला आहे. त्यामुळे राज्यांनी निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करून ते म्हणाले, इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही ५० टक्क्यांच्या पुढे आरक्षण द्यावे, यासाठी राज्य सरकारने निर्णय घ्यावा.

नारायण राणेंच्या विषयावर श्री. आठवले म्हणाले, भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाली, त्याला काय म्हणावे, हे मुख्यमंत्र्यांना आठवले नाही. कदाचित आठवले त्यांच्यासमवेत नसल्याने त्यांना आठवत नसावे. त्यावरून नारायण राणे बोलले होते. पण मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री या दोघांनीही एकमेकांचा सन्मान केला पाहिजे. पण नारायण राणे कोणालाही घाबरणार नाहीत ते डॅशिंग आहेत. रिपब्लिकन पक्ष त्यांच्या पाठीशी आहे. एखाद्या भाषणातून होणाऱ्या आरोपावरून तातडीने अटक होत नाही. महाराष्ट्रात केंद्रीय मंत्र्यांचा अपमान झाला असून सत्तेचा उपयोग शिवसेनेकडून सुडबुद्धीने केला जात आहे, असा टोलाही श्री. आठवले यांनी लगावला. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि दवेंद्र फडणवीस यांच्यातील भेटीविषयी बोलताना आठवले म्हणाले, या भेटीत काय चर्चा झाली ही माहिती नाही. पण, नारायण राणेंच्या संदर्भात दोघे बोलले असतील. कदाचित, दोघांत एकत्र येण्यासंदर्भातही चर्चा झाली असेल. यामध्ये पाच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री रहावा. उपमुख्यमंत्रीपद भाजपला द्यावे यापध्दतीची चर्चा झाली असेल. मुळात नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांचे अजिबात पटत नाही. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचे पूर्वीपासून चांगले संबंध आहेत.

उद्या शिवसेना व भाजप एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याचा प्रयोग होत असेल तर त्याचा विचार उद्धव ठाकरे यांनी करावा. शिवसेनेत मात्र, दोन मत प्रवाह आहेत, यातील एक मोठा मत प्रवाह आहे, जो आपण भाजपसोबत जाणे आवश्यक आहे, असे म्हणत असल्याचे श्री. आठवले यांनी सांगितले.  नारायण राणेंची भाषा संविधानाला धरून आहे का, या प्रश्नावर आठवले म्हणाले, शिवसेनेची भाषाही घटनाविरोधी असून महाराष्ट्राची अस्मिता दोघांनीही जपावी, जनाआशिर्वाद यात्रेला मिळालेला प्रतिसाद शिवसेनेला पहावला नाही, त्यातून त्यांनी नारायण राणेंबाबत अशी भूमिक घेतल्याचाही आरोप आठवलेंनी केला.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थोबाड फोडण्याची भाषा केली होती. त्याबद्दल उद्धव ठाकरेंना का अटक करू नये, असा प्रश्नही श्री. आठवलेंनी उपस्थित केला. मोदींवर सातत्याने होणाऱ्या टीकेवर श्री. आठवले म्हणाले, मोदींविरोधात कितीही कट कारस्थान केले तरी मोदींना कोणीही अडवून शकत नाही. आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत देशात पुन्हा भाजप व रिपब्लिकन पक्षाचेच सरकार सत्तेत येईल, असे भाकित त्यांनी केले. 

रिपाई टोलमाफी आंदोलन करणार...
पुणे जिल्ह्याप्रमाणे सातारा जिल्ह्यातील टोलनाक्यांवर एमएच ११ व एमएच ५० या वाहनांना टोलमाफी मिळायला हवी, अशी आमची मागणी असून यासाठी आंदोलन करण्याचा निर्णय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने घेण्यात येईल, असे मंत्री आठवले यांनी सांगितले. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in