उदयनराजेंच्या त्या घोषणेचे काय झाले? तुमच्या नगरसेवकांच्या हप्त्यांतून तरी सूट द्या.....

घोषणा करून दीड महिना उलटला तरी पालिकेकडून कोणतीही हालचाल झालेली नाही. उदयनराजेंनी जाहीर केल्याप्रमाणे एक हजार रुपये फेरीवाल्यांना अजून का दिले गेले नाहीत. बहुदा मर्जीतल्या ठेकेदारांची बिले काढायची गडबड असल्याने आणि त्यातून कमीशन लाटायचे असल्याने सातारा पालिका फेरीवाल्यांचे पैसे देऊ शकत नसावी.
What happened to Udayan Raje's announcement? At least give relief from the installments of your corporators .....
What happened to Udayan Raje's announcement? At least give relief from the installments of your corporators .....

सातारा : लॉकडाउनमध्ये फेरीवाल्यांना दिलासा देण्यासाठी सातारा नगर पालिका (Satara Palika) फेरीवाल्यांना (Hawkars) प्रत्येकी एक हजार रुपये मदत देणार असल्याची घोषणा खासदार उदयनराजेंनी (Udayanraje Bhosale) केली होती. या घोषणेला आता दीड महिना उलटला असून उपासमारीने हैराण झालेले फेरीवाले या एक हजार रुपयांच्या मदतीची आतुरतेने वाट बघत आहेत. खासदार उदयनराजेंच्या घोषणेची सातारा पालिका अंमलबजावणी कधी करणार? का ही घोषणाही हवेत विरणार आहे, असा प्रश्न सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांनी उपस्थित केला आहे. What happened to Udayan Raje's announcement? At least give relief from the installments of your corporators .....

कोरोना महामारी आणि लॉकडाउनमुळे गतवर्षात फेरीवाल्यांचे अतोनात नुकसान झाले.सध्याच्या घडीला फेरीवाल्यांचे जगणे मुश्किल झाले असून त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. लॉकडाउनमध्ये फेरीवाल्यांना दिलासा मिळावा म्हणून उदयनराजेंनी सातारा पालिकेकडून प्रत्येक फेरीवाल्याला एक हजार रुपये आर्थिक मदत देण्याची मोठी घोषणा केली होती.

त्यांच्या घोषणेचे जोरदार स्वागतही झाले होते. गेले महिनाभरापासून लॉकडाउन सुरु असून हातावर पोट असणाऱ्या फेरीवाल्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. त्यांच्यासह त्यांच्या बायकापोरांची, वृद्ध आईवडीलांची उपासमार सुरु आहे. मात्र अद्यापही खासदार उदयनराजेंनी जाहीर केलेली एक हजार
रुपयांची मदत सातारा पालिकेकडून फेरीवाल्यांना मिळालेली नाही. 

डोळ्यात प्राण आणून या आर्थिक मदतीची वाट फेरीवाले बघत आहेत. घोषणा करून दीड महिना उलटला तरी पालिकेकडून कोणतीही हालचाल झालेली नाही. उदयनराजेंनी जाहीर केल्याप्रमाणे एक हजार रुपये फेरीवाल्यांना अजून का दिले गेले नाहीत. बहुदा मर्जीतल्या ठेकेदारांची बिले काढायची गडबड असल्याने आणि त्यातून कमीशन लाटायचे असल्याने सातारा पालिका फेरीवाल्यांचे पैसे देऊ शकत नसावी. फेरीवाल्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला असल्याने उदयनराजेंच्या घोषणेप्रमाणे पालिकेकडून फेरीवाल्यांना तात्काळ मदत मिळाली पाहिजे, असे शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे.

नगरसेवकांच्या हप्त्यातून सवलतीची योजना जाहीर करा... 
खासदार उदयनराजेंनी घोषणा करूनही फेरीवाल्यांना पालिकेकडून अद्यापही आर्थिक मदत मिळाली नाही, याचे आश्चर्य आहे. आत्ता फेरीवाल्यांना मदत देता येत नसेल तर, लॉकडाउन संपून पुन्हा कधी हॉकर्सचा व्यवसाय सुरु होईल आणि तेव्हा सत्ताधारी नगरसेवक फेरीवाल्यांकडून पुन्हा हप्ते गोळा करण्यास सुरुवात करतील. तेव्हा त्यामध्ये एक हजार रुपये सवलत देऊ, अशी अभिनव योजना तरी पालिकेने जाहीर करून टाकावी, असा उपरोधिक टोला आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी लगावला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com