कोरोना लसीबाबत केंद्र सरकार गोंधळलेलेच; जे जगात घडले नाही ते भारतात घडले... - What didn't happen in the world about corona vaccine happened in India says MLA Prithviraj Chavan | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनास सुरवात

कोरोना लसीबाबत केंद्र सरकार गोंधळलेलेच; जे जगात घडले नाही ते भारतात घडले...

संजय जगताप
बुधवार, 2 जून 2021

थाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा, दिवे लावा, अशा अवैज्ञानिक कृतीमुळेच सध्याची भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी टीका करून श्री. चव्हाण म्हणाले, "लशीबाबत जगात जे घडले नाही. ते भारतात घडले आहे. त्यामुळेच लोकांचे जीव जात आहेत. प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. ते भरून निघणे कठीण आहे. केंद्र सरकार गोंधळलेल्या स्थितीत आहे.'' 

मायणी : कोरोना लशीच्या बाबतीत केंद्र सरकारची परिस्थिती गोंधळाची असून, त्यामुळे अपरिमित जीवित हानी व आर्थिक नुकसान होत आहे, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. 

मायणी (ता. खटाव) येथील डेडिकेटेड कोरोना सेंटरचे उद्‌घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, हरणाई सूतगिरणीचे संस्थापक अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, मायणी मेडिकल कॉलेजचे संस्थापक डॉ. एम. आर. देशमुख, कॉंग्रेसचे खटाव तालुकाध्यक्ष डॉ. विवेक देशमुख, सरपंच सचिन गुदगे, माजी सरपंच आप्पासाहेब देशमुख, प्रकाश कणसे, संजीव साळुंखे, शंकर माळी उपस्थित होते. 

हेही वाचा : राज्यपाल कोट्यातील १२ आमदारांची नावे ठाकरे सरकार बदलणार?

थाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा, दिवे लावा, अशा अवैज्ञानिक कृतीमुळेच सध्याची भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी टीका करून श्री. चव्हाण म्हणाले, "लशीबाबत जगात जे घडले नाही. ते भारतात घडले आहे. त्यामुळेच लोकांचे जीव जात आहेत. प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. ते भरून निघणे कठीण आहे. केंद्र सरकार गोंधळलेल्या स्थितीत आहे.'' 

आवश्य वाचा :  मराठा आरक्षण; नेते म्हणाले, `मूळ प्रश्‍नाला सरकारकडून बगल`

डॉ. येळगावकर म्हणाले, "मेडिकल कॉलेजमध्ये डेडिकेटेड कोरोना सेंटर असूनही मायणी व खटाव तालुक्‍यातील रुग्णांना तेथे बेड मिळत नाहीत. उपचारासाठी अन्यत्र धावाधाव करावी लागत आहे. त्यावर पर्याय म्हणूनच येथील स्थानिक डॉक्‍टरांनी स्वतंत्र कोरोना उपचार केंद्र सुरू केले.'' दरम्यान, पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनीही केंद्राला भेट देऊन पाहणी केली. त्या वेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, डॉ. येळगावकर, जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे, नंदकुमार मोरे, सचिन गुदगे, पोलिस उपअधीक्षक नीलेश देशमुख, प्रांताधिकारी कासार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. युनुस शेख, डॉ. सुशीलकुमार तुरुकमाने उपस्थित होते. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख