विवेक पाटलांच्या घशातून दडविलेले पैसे काढणार......

श्री. पाटील यांनी बँकेची पूर्णपणे सुत्रे ताब्यात घेऊन अनैतिकपणे बँकच्या निधीचा वापर करण्यास सुरवात केली. यामाध्यमातून पक्षाच्या निवडणूका लढविण्यासाठी बँकेचा वापर केला. तसेच स्वतःचे धंदे चालविण्यासाठी ही केला.
विवेक पाटलांच्या घशातून दडविलेले पैसे काढणार......

मुंबई : कर्नाळा सहकारी बँकेतील Karnala Sahakari Bank गैरव्यवहारप्रकरणी विवेक पाटलांच्या Vivek Patil घशातून त्यांनी दडविलेले पैसे काढण्यासाठी आम्ही जंगजंग पछाडतो आहे. किरीट सोमय्या पहिल्यादिवसांपासून आमच्या सोबत आहेत. ठेवीदारांच्या ठेवी परत मिळेपर्यंत आम्ही थांबणार नाही, अशी ठाम भूमिका पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर MLA Prashant Thackur यांनी घेतली आहे. "We will not wait until the depositors' deposits are returned,"  PrashantThakur said. : 

कर्नाळा सहकारी बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) अटक केली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. या आधी त्यांच्या वाहनांची जप्ती करण्यात आली होती. आता काल त्यांना थेट अटक झाल्याने गुंतवणूकदारांच्या लढ्याला यश मिळणार आहे. कर्नाळा नागरी सहकारी बँकेत सुमारे ५४० कोटी रूपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे.

त्याबद्दल राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून तपास सुरू असून शंभर कोटी रूपयांपेक्षा अधिक रकमेचा घोटाळा असल्याने अंमलबजावणी संचालनालयाला त्यांच्या तपासाचा अधिकार मिळतो. त्यानुसार चौकशी सुरू होती. यासंदर्भात ठेवीदारांसाठी संघर्ष करणारे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्याशी प्रसार माध्यमांनी संवाद साधला असता ते म्हणाले, गेल्या वर्षभरात सातत्याने विवेक पाटलांच्यामार्फत झालेल्या घोटाळ्यातून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी ठेवीदारांनी मागणी होती.

त्यांनी ५२० कोटींचा गफला केला असून हा पैसा त्यांनी दडविला आहे. तो जप्त करून तो ठेवीदारांना परत दिला पाहिजे, यासाठी हा आमचा संघर्ष होता. आता ईडीच्या कारवाईमुळे याला प्रत्यक्ष सुरवात होत आहे. .या बँकेतील घोटाळ्याची नेमकी काय पार्श्वभूमी आहे, या प्रश्नावर प्रशांत ठाकूर म्हणाले, सर्वसामान्यांना कर्ज मिळावे व व्यवसायात मदत व्हावी या भावनेतून विवेक पाटील यांनी कर्नाळा सहकारी बँकेची स्थापना केली. त्यावेळी त्यांच्यासमवेत रामशेठ ठाकूर व अन्य संचालक होते. त्यानंतर विवेक पाटील यांचा एककल्ली कारभार पुढे आला, त्यामुळे रामशेठ ठाकूर यांनी वर्षे, दीड वर्षात बँक सोडली.

हळूहळू बाकीचे संचालकही बाजूला झाले. त्यानंतर श्री. पाटील यांनी  बँकेची पूर्णपणे सुत्रे ताब्यात घेऊन अनैतिकपणे बँकच्या निधीचा वापर करण्यास सुरवात केली. यामाध्यमातून पक्षाच्या निवडणूका लढविण्यासाठी बँकेचा वापर केला. तसेच स्वतःचे धंदे चालविण्यासाठी ही केला. यासंदर्भात २००९ मध्ये आम्ही तक्रार केली होती. दुर्देवाने त्यावेळी सहकार विभागाकडून मदत मिळाली नाही. विवेक पाटलांविरोधात हातामध्ये सक्षम पुरावा ही नव्हता. एक पुरावा होता पण तोही मान्य केला नव्हता. यानंतरच्या कालावधीत एक, दोन वेळा काही माहिती मिळाल्यावर लोकांनीही त्यांच्यावर आरोप करण्यास सुरवात केली.

२०१९ याला प्रत्यक्ष सुरवात झाली. जुन, जुलैमध्ये मुदत संपलेल्या ठेवींचे पैसे ठेवीदारांना परत मिळेनासे झाले. त्यावेळी त्यांनी लोकांना चेक दिले ते परत जाऊ लागले, आरटीजीएसही केले ते परत जाऊ लागले. त्यानंतर बँकेने सर्व ऑपरेशनस्‌ बंद केले. यासंदर्भात ठेवीदारांत त्यांना विरोध करण्याची ताकद नव्हती. कारण एकतर ते शेकापचे आमदार असून चार वेळा निवडून आलेले आमदार तसेच शेतकरी व कामगारांत या पक्षाविषयी विश्वासार्हता होती. त्यामुळे त्यांच्या विरोधात कोणीच आवाज उठविण्यास तयार नव्हते.

राजकारणाचा शिक्का बसेल म्हणून निवडणूकीच्या काळात आम्हीही आवाज उठविण्याचे थांबविले. पण मी सप्टेंबर २०१९ मध्ये प्रत्यक्ष ठेवीदारांशी बोललो त्यावेळी आमच्यावर ही आरोप झाले. आम्ही किरीट सोमय्यांना सोबत घेऊन याविरोधात आवाज उठविला. त्यावेळी राजकारणासाठी हे सर्व करताय, विवेक पाटील सच्चा माणूस आहे. तो कोणाचेही पैसे बुडणार नाहीत, असे सांगण्यात आले. त्यानंतर शेकापचे नेते ही त्यांना भेटले. पण ज्यावेळी जवळच्या लोकांना पैसे मागूनही मिळाले नाहीत.

त्यानंतर मात्र, त्यांच्यावरचा लोकांचा विश्वास उडाला. त्यावेळी सत्तेत महाविकास आघाडीचे सरकार होते. सहकारमंत्र्यांना भेटलो. विधानसभेत प्रश्न विचारला होता. त्यावर महाविकास आघाडी सरकारनेही काहीच केले नाही. मे महिना लोटला तरी पोलिसही काहीच करायला तयार नव्हते. त्यांचा मुलगा संचालक असल्याने त्याला अटक होऊ नये, म्हणून या सगळ्याला मीच बजबाबदार असल्याचे विवेक पाटलांनी सांगितले. ते जबाबदार असूनही कारवाई शून्य होती. मात्र, त्यानंतर विधान भवनाच्या पायऱ्यावर बसून आम्ही आंदोलन केले.

त्यावेळी सहकारमंत्र्यांनी बैठक लावण्याचे आश्वासन दिले. पण बैठक लागली नाही. शेवटी काल ईडीने कारवाई केली.  बँकेचे ५० हजार ठेवीदार असून आता त्यांना पैसे परत मिळणार का, या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले, ठेवीदार संघर्ष समितीचे अध्यक्ष महेश भालके असून त्यांच्या नेतृत्वाखाली आमचा संघर्ष सुरू आहे. विवेक पाटलांच्या घशातून त्यांनी दडविलेले पैसे काढण्यासाठी आम्ही जंगजंग पछाडतो आहे. किरीट सोमय्या पहिल्यादिवसांपासून आमच्या सोबत आहेत. ठेवीदारांच्या ठेवी परत मिळेपर्यंत आम्ही थांबणार नाही, असेही आमदार ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com