ओढ्यावरील अतिक्रमणामुळे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या घरात घुसले पाणी  - Water seeped into MP Srinivas Patil's house due to encroachment | Politics Marathi News - Sarkarnama

ओढ्यावरील अतिक्रमणामुळे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या घरात घुसले पाणी 

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 2 जून 2021

संबंधित ओढ्याचे पाणी प्रवाहीत होऊन पाण्याचे लोट थेट खासदार पाटील यांच्या बंगल्यात घुसले. त्यामुळे सर्वत्र पाणी-पाणी झाले. त्याची माहिती मिळतात प्रांताधिकारी दिघे, तहसीलदार वाकडे यांनी तेथे जावुन पाहणी केली. त्यावेळी त्यांना तेथुन जवळच असलेल्या एका ओढ्यावर बांधकाम झाल्याने तो ओढा बऱ्यापैकी बुजल्याचे दिसुन आले. त्यामुळे तेथील साचलेले पाणी खासदार पाटील यांच्या घरात घुसले.

कऱ्हाड : ओढ्यावर अतिक्रमण (encroachment on the stream) करुन बांधकाम करण्यात आल्याने पावसाचे पाणी थेट खासदार श्रीनिवास पाटील  (MP Srinivas Patil)  यांच्या घरात घुसले. त्यानंतर प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी तेथील पाहणी करुन ओढा मुजवणाऱ्या एका बांधकाम व्यावसायिकास तातडीने ओढ्यावरील अतिक्रमण काढुन ओढा पुर्ववत वाहता करण्याच्या सुचना तहसीलदार वाकडे यांनी दिल्या आहेत.  Water seeped into MP Srinivas Patil's house due to encroachment on the stream

कऱ्हाडला काल (मंगळवारी) मुसळधार पाऊस झाला. कमी कालावधीत जास्त पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचुन रस्तेही जलमय झाले. पावसाचा जोर मोठा असल्याने पावसाचे साचलेले पाणी अनेक ठिकाणी घुसुन नुकसान झाले. गोटे येथील ओढ्यावर अतिक्रमण करुन बांधकाम करण्यात आले आहे. त्यामुळे गोटेतील नैसर्गिक प्रवाह बंद झाला आहे. त्याचा फटका खासदार पाटील यांच्या बंगल्याला बसला. 

हेही वाचा : पदांच्या वाटपावरून भाजपमध्ये नाराजीचा सूर?

संबंधित ओढ्याचे पाणी प्रवाहीत होऊन पाण्याचे लोट थेट खासदार पाटील यांच्या बंगल्यात घुसले. त्यामुळे सर्वत्र पाणी-पाणी झाले. त्याची माहिती मिळतात प्रांताधिकारी दिघे, तहसीलदार वाकडे यांनी तेथे जावुन पाहणी केली. त्यावेळी त्यांना तेथुन जवळच असलेल्या एका ओढ्यावर बांधकाम झाल्याने तो ओढा बऱ्यापैकी बुजल्याचे दिसुन आले. त्यामुळे तेथील साचलेले पाणी खासदार पाटील यांच्या घरात घुसले.

आवश्य वाचा : पुढचे ३ दिवस नागरिकांची परिक्षा, अन्यथा पुन्हा लॉकडाउनचे संकेत

पाहणीनंतर तहसीलदार वाकडे यांनी संबंधित ओढ्यावरील अवैध बांधकाम तातडीने काढुन ओढा पुर्ववत वाहता करावा, अशा सुचना संबंधित बांधकाम व्यावसायीकाला दिल्या आहेत. मंडल अधिकारी व तलाठी यांना तातडीने कार्यवाही करुन अहवाल देण्याच्या सुचना दिल्याचे तहसीलदार वाकडे यांनी सांगीतले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख