चिखल तुडवत पालकमंत्री, गृहराज्यमंत्री पोहोचले आंबेघरात; शासनाची सर्वतोपरी मदत मिळवून देणार - Walking in the mud, the Guardian Minister, Minister of State for Home Affairs reached Ambeghar; Will get all possible help from the government-ub73 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

चिखल तुडवत पालकमंत्री, गृहराज्यमंत्री पोहोचले आंबेघरात; शासनाची सर्वतोपरी मदत मिळवून देणार

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 24 जुलै 2021

बाळासाहेब पाटील घटनास्थळी पोहोचले. त्यांनी त्या ठिकाणी नेमक्या परिस्थितीची पाहणी केली. तसेच या घटनेत मातीखाली गाडले गेलेल्या लोकांच्या नातेवाईकांची भेट घेतली.

सातारा : पाटण तालुक्यातील आंबेघर येथे भूस्खलन झाले होते. या ठिकाणी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज चार किलोमीटर चिखल तुडवत प्रवास करून घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळाची पहाणी करून माती खाली गाडले गेलेल्या लोकांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करून धीर दिला. शासन तुमच्या पाठिशी असून शासनातर्फे सर्वतोपरी मदत मिळवून देणार असल्याची ग्वाही पालकमंत्री पाटील यांनी यावेळी उपस्थित ग्रामस्थांना दिली. यावेळी त्यांच्यासमवेत गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई होते. Walking in the mud, the Guardian Minister, Minister of State for Home Affairs reached Ambeghar; Will get all possible help from the government

दरम्यान, 15 लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले होते. त्यापैकी एनडीआरएफच्या टीमच्या मदतीने आतापर्यत ११ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. यातील सहा जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. आंबेघर येथे अतिवृष्टीने झालेल्या भूस्खलनाच्या ठिकाणी आज जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जाऊन एनडीआरएफच्या टीमकडून सुरू असलेल्या बचावर कार्याची माहिती घेतली.

हेही वाचा : राणे, लाड यांना भाजपनं दिली नवी जबाबदारी

दरम्यान, घटनास्थळी पाहणी करण्यासाठी काल (शुक्रवार) पालकमंत्री बाळासाहेब पाटील गेले होते. मात्र, रस्त्यावरील ओढ्यावरून मोठ्याप्रमाणात पाणी वाहत होते. घटनास्थळी जाणारा रस्ता बंद होता. त्यामुळे ते त्या ठिकाणी पोहोचू शकले नाहीत.  आज (शनिवारी) पावसाने थोडी उसंत दिल्याने ओढ्यावरील पाणी ओसरल्याने रस्त्याने चार किलोमीटरचा चिखल तुडवत प्रवास करून बाळासाहेब पाटील घटनास्थळी पोहोचले. त्यांनी त्या ठिकाणी नेमक्या परिस्थितीची पाहणी केली. तसेच या घटनेत मातीखाली गाडले गेलेल्या लोकांच्या नातेवाईकांची भेट घेतली. मातीच्या ढिगाऱ्याखालुन आतापर्यंत 11 मृतदेह काढण्यात आले आहेत. 

आवश्य वाचा : मुख्यमंत्री स्वत: गाडी चालवत कोकणच्या दिशेने निघालेत का..

तसेच आणखी बेपत्ता लोकांचा शोध घेण्याचा प्रयत्न एनडीआरएफचे पथक युद्धपातळीवर काम करत आहे. यावेळी बाळासाहेब पाटील यांच्या समवेत राज्य लेखा समितीचे अध्यक्ष शहाजीराव क्षीरसागर, पाटण तालुक्याचे युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर, माजी उपायुक्त तानाजीराव साळुंखे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पाटणचे प्रांताधिकारी तांबे, पाटणचे तहसीलदार योगेश टोनपे, कराडचे तहसीलदार अमरदीप वाकडे उपस्थित होते.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख