विलासकाकांनी उदयनराजेंना राजकारणातील 'हिरो' केले होते.... - Vilaskaka had made Udayanraje a 'hero' in politics .... | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

विलासकाकांनी उदयनराजेंना राजकारणातील 'हिरो' केले होते....

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 4 जानेवारी 2021

उंडाळकर काकांच्या वाढदिनी दोन वर्षांपूर्वी खासदार उदयनराजे भोसले यांनी घरी जाऊन शुभेच्छा दिल्या होत्या. यावेळी उदयनराजेंशी त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणाविषयी चर्चा केली होती. उदयनराजेंनी काकांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या, तसेच त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.

सातारा : खासदार उदयनराजे म्हणजे राजकारणातील हिरो आहेत. त्यांची राजकिय खलबते राजकारण्यांसह सर्वांनाच विचार करायला लावतात, अशा शब्दात माजी आमदार विलासराव पाटील उंडाळकर यांनी आपल्या वाढदिनी शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या खासदार उदयनराजे भोसले यांची स्तुती केली होती. 

उंडाळकर काकांच्या वाढदिनी दोन वर्षांपूर्वी खासदार उदयनराजे भोसले यांनी घरी जाऊन शुभेच्छा दिल्या होत्या. यावेळी उदयनराजेंशी त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणाविषयी चर्चा केली होती. उदयनराजेंनी काकांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या, तसेच त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.

दोघात सुमारे तासभर विविध विषयांवर चर्चा रंगली होती. त्यावेळी उदयनराजे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांत कलगीतूरा रंगला होता. त्यावेळी उंडाळकर काकांनी खासदार उदयनराजे म्हणजे राजकारणातील हिरो आहेत. त्यांची राजकिय खलबते राजकारण्यांसह सर्वांनाच विचार करायला लावतात, अशा शब्दात स्तुती केली होती. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख