मंदिरे 'बंद'चा निर्णय केंद्राचाच; भाजप नेत्यांनी मोदींना साकडे घालावे...

भाजपचे शंखनाद आंदोलन हे राज्य नाही तर केंद्र सरकारच्या विरोधात आहेत. त्यामुळे धार्मिक भावनांचा आधार घेत भाजपकडून लोकांना भडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप ही त्यांनी केला.
मंदिरे 'बंद'चा निर्णय केंद्राचाच; भाजप नेत्यांनी मोदींना साकडे घालावे...
Vijay Wadettiwar criticizes BJP leader

मुंबई : मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय आमचा नाही. हा निर्णय केंद्र सरकारचा आहे. अशा प्रकारे आंदोलन करण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच भाजपा नेत्यांनी साकडे घालावे. त्यांना मंदिरे उघडण्याचे आदेश द्या असे सांगावे. त्यानंतर अशा प्रकारची घंटानाद आंदोलने करण्याची भाजपवर वेळ येणार नाही, असा टोला मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजपाच्या घंटानाद आंदोलन करणाऱ्यांना लगावला आहे. Vijay Vadettiwar criticizes BJP leader

वडेट्टीवार म्हणाले, मंदिरे खुली करण्याच्या आंदोलनातून भाजप नेत्यांकडून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आंदोलनातून मुख्यमंत्री ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. आम्ही फक्त केंद्राच्या सूचनांचे पालन करत आहोत. भाजपने भानात येऊन बोलावे. बेधुंद वक्तव्य करू नयेत. 

जर केंद्र सरकारने मंदिरे खुली करण्याचा निर्णय उद्याच घेतला तर आम्ही त्याची अंमलबजावणी लगेच करू. केंद्राच्या सूचनेप्रमाणे आम्ही काम करतोय. आणि केंद्राकडून मंदिरे न उघडण्याच्या सूचना आहेत. भाजपचे शंखनाद आंदोलन हे राज्य नाही तर केंद्र सरकारच्या विरोधात आहेत. त्यामुळे धार्मिक भावनांचा आधार घेत भाजपकडून लोकांना भडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप ही त्यांनी केला.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in