उंडाळकरांसारखा दिग्गज नेता सातारा जिल्ह्यात पुन्हा होणार नाही.... - Veteran leader like Undalkar will not happen again in Satara district .... | Politics Marathi News - Sarkarnama

उंडाळकरांसारखा दिग्गज नेता सातारा जिल्ह्यात पुन्हा होणार नाही....

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 4 जानेवारी 2021

उंडाळकर घराण्याला स्वातंत्र्य सैनिकांची परंपरा आहे. तहयात सर्वच उंडाळकर बंधूंनी ती जपण्याचा प्रयत्न केला. सातारा जिल्हा बँकेसह सर्वच मोठ्या संस्था आज ज्या प्रगती पथावर आहेत, त्या इथपर्यंत आणण्याचे काम विलासराव पाटील उंडाळकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात झाले आहे.

सातारा : माजी आमदार विलासराव पाटील उंडाळकर यांचे आज दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने राज्यातील सहकार क्षेत्रासह सर्वच क्षेत्राची प्रचंड हानी झाली आहे. आमचे त्यांच्याशी कौटुंबिक संबंध असले तरी राजकारणात व सामाजिक जीवनात सातारा जिल्ह्यात असे नेतृत्व पुन्हा होणार नाही, अशी खंत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केली. 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासराव पाटील उंडाळकर यांचे आज अल्प आजाराने निधन झाले. उंडाळकरांना श्रध्दांजली वाहताना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, सातारा जिल्ह्यातील या दिग्गज नेत्याने महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोठा वाटा उचलला आहे. त्यांच्या निधनाने राज्यातील सहकार क्षेत्रासह इतर सर्वच क्षेत्राची प्रचंड हानी झाली आहे.

उंडाळकर घराण्याला स्वातंत्र्य सैनिकांची परंपरा आहे. तहयात सर्वच उंडाळकर बंधूंनी ती जपण्याचा प्रयत्न केला. सातारा जिल्हा बँकेसह सर्वच मोठ्या संस्था आज ज्या प्रगती पथावर आहेत, त्या इथपर्यंत आणण्याचे काम विलासराव पाटील उंडाळकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात झाले आहे.

आमचे त्यांच्याशी कौटुंबिक संबंध असले तरी राजकारणात जिल्ह्यात असे नेतृत्व पुन्हा होणार नाही, ही खंत मंत्री देसाई यांनी व्यक्त केली. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्य शासनाच्या वतीने विलासराव पाटील उंडाळकरांना त्यांनी श्रध्दांजली अर्पण केली.
 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख