काँग्रेसचे दिग्गज नेते मोठ्या कालावधीनंतर साताऱ्यात

हुतात्म्यांच्या स्मृती जागविण्यासाठी काँग्रेस पक्षाच्यावतीने हुतात्मा अभिवादन व स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान कार्यक्रम होणार आहे.
काँग्रेसचे दिग्गज नेते मोठ्या कालावधीनंतर साताऱ्यात
Veteran Congress leaders will arrive in Vaduj (Tal. Khatav) today to greet the martyrs

वडूज : राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्यावतीने गुरुवारी (ता. 9) वडुज (ता. खटाव) येथील हुतात्मा स्मारकात हुतात्म्यांना अभिवादन व स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आल्याची माहिती संयोजन समितीचे स्वागताध्यक्ष, पक्षाचे प्रदेश सचिव रणजितसिंह देशमुख यांनी दिली.

श्री. देशमुख यांनी सांगितले की, 1942 साली मुंबई येथील काँग्रेस अधिवेशनात इंग्रजांनो 'चले जाओ' चा नारा दिला होता. त्यानंतर देशभरात अनेक ठिकाणी चळवळी झाल्या. यामध्ये जुना सातारा - सांगली जिल्हा प्रामुख्याने आघाडीवर होता. स्वातंत्र्य चळवळीत सातारच्या प्रति सरकार चळवळीला विशेष ऐतिहासिक महत्व आहे.

या आंदोलनात जिल्ह्यातील वडूज येथे नऊ सप्टेंबर 1942 साली हुतात्मा परशुराम घार्गे यांच्या नेतृत्वाखाली वडूज कचेरीवर भव्य मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी इंग्रज अधिकाऱ्याने केलेल्या गोळीबारात नऊ हुतात्म्यांनी बलीदान दिले होते. त्यांच्या स्मृती जागविण्यासाठी पक्षाच्यावतीने हुतात्मा अभिवादन व स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमासाठी अखिल भारतीय काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, कृषीराज्यमंत्री विश्वजीत कदम, पक्षाच्या सहप्रभारी श्रीमती सोनल पटेल, कार्याध्यक्ष बसवराज पाटील, युवकचे अध्यक्ष सत्यजीत तांबे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. 

पक्षाचे अखिल भारतीय सचिव पृथ्वीराज साठे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, सरचिटणीस विनायक देशमुख, अभय छाजेड, सरचिटणीस गुलाबराव घोरपडे, आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. याशिवाय माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच यावेळी जिल्ह्यातील काँग्रेसचे विविध मान्यवर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली रणजितसिंह देशमुख, जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्यासह खटाव-माण तालुक्यातील पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. यावेळी माण विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष डॉ. महेश गुरव, खटाव तालुकाध्यक्ष डॉ. विवेक देशमुख, माण तालुकाध्यक्ष बाबासाहेब माने, नियोजन समितीचे सदस्य अशोकराव गोडसे, राजुभाई मुलाणी, सत्यवान कांबळे, सत्यवान कमाने तसेच प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in