व्हेंटिलेटर बनविणाऱ्यांनी थोडी माणुसकी दाखवायला हवी होती.... - Ventilator makers wanted to show a little bit of humanity says Dy CM Ajit Pawar | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

व्हेंटिलेटर बनविणाऱ्यांनी थोडी माणुसकी दाखवायला हवी होती....

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 29 मे 2021

श्री. पवार म्हणाले, पीएम केअरमधून अनेक व्हेंटिलेटर उपलब्ध झाली आहेत. पण अनेक ठिकाणी ही व्हेंटिलेटर बंद पडली आहेत. कोरोनाच्या काळात मला याचे राजकारण करायचे नाही.

सातारा : पीएम केअर योजनेतून  (PM care Fund) मिळालेले व्हेंटिलेटर बंद पडले आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray)  यांनीही केंद्राकडे तक्रार केली होती. मला या गोष्टीचे राजकारण करायचे नाही. पण कोरोनाच्या काळात ही व्हेंटिलेटर बनविणाऱ्यांनी थोडी माणुसकी दाखवायला हवी होती. अशी लोक मढ्याच्या टाळूवरचेही लोणी खात असतात. त्यांना जितराब म्हणायचे की आणखी काय ते तु्म्ह ठरवा, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar)  यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. Ventilator makers wanted to show a little bit of humanity says Dy CM Ajit Pawar

पीएम केअर फंडातून राज्यात व्हेंटिलेटर्स उपलब्ध करण्यात आली आहेत. यातील अनेक व्हेंटिलेटर चालत नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. सातारा जिल्ह्यात या फंडातून आलेली व्हेंटिलेटर बंद असल्याचे पत्रकारांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर श्री. पवार म्हणाले, पीएम केअरमधून अनेक व्हेंटिलेटर उपलब्ध झाली आहेत. पण अनेक ठिकाणी ही व्हेंटिलेटर बंद पडली आहेत. कोरोनाच्या काळात मला याचे राजकारण करायचे नाही.

हेही वाचा : मराठा आरक्षणाला महाविकास आघाडी सरकारमधील अर्ध्या मंत्र्यांचा विरोध..

पण यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सुद्ध केंद्राकडे याबाबतची तक्रार केली आहे. मुळात कोरोनाच्या या परिस्थितीत ही व्हेंटिलेटर बनविणाऱ्यांनी थोडी माणुसकी दाखवली पाहिजे होती. अशी लोक मढ्याच्या टाळूवरील लोणी खायलाही मागे पुढे पहात नाहीत. त्यांना जितराब म्हणायचं की आणखी काय ते तुम्ही ठरवा, अशी सडेतोड टीका श्री. पवार यांनी केली.   

आवश्य वाचा :  लसीकरणावरून राजकीय वाद ! तीन पक्षाचे नेते एकाच वेळी आरोग्य अधिकाऱ्यांच्या दालनात

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख