आनेवाडी टोलनाक्यावरून वाहने विनाटोल सोडली; पगार थकल्याने कर्मचाऱ्यांचे आंदोलन   - Vehicles released from Anewadi Toll Plaza; Employee agitation due to salary fatigue | Politics Marathi News - Sarkarnama

आनेवाडी टोलनाक्यावरून वाहने विनाटोल सोडली; पगार थकल्याने कर्मचाऱ्यांचे आंदोलन  

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 12 मार्च 2021

आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास येथील कर्मचाऱ्यांनी एकत्र येत गेल्या तीन महिन्यापासुन न मिळालेल्या वेतनामुळे कोणीही बूथवर न जाता टोल ऑफिसमोर बसून राहिले. टोल व्यवस्थापक विवेक शर्मा यांच्याशी या कर्मचाऱ्यांनी चर्चा केली. तेव्हा त्यांनी 20 तारखेपर्यंत काम चालू ठेवा, असे सांगितले.

सायगांव : पुणे- बंगळूर महामार्गावर असणाऱ्या आनेवाड़ी टोल नाक्‍यावर १२० कर्मचाऱ्यांना गेल्या तीन महिन्यापासून वेतन दिले नाही. त्यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी आज दुपारपासून अचानक संप केला. त्यामुळे टोल नाक्‍यापासून काही किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या. काही लेनवर गर्दी वाढल्याने वाहने विना टोल सोडून देण्यात आली. 

कोरोना व फास्टॅग सक्तीमुळे अनेक कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या तीन महिन्यापासून पगार न झाल्याने कुटुंब चालवायचे कसे हा प्रश्न उदभावल्याने दुपारच्या शिफ्टला येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले. त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली. मात्र, कोणीच कामावर हजर न झाल्याने दोन्ही दिशेला सुरू असलेल्या दोन लेनही बंद करून सर्वच वाहने मोफत सोडली जात होती.

पोलिसांनी सर्व वाहने मोफत सोडण्याचा निर्णय घेतला. आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास येथील कर्मचाऱ्यांनी एकत्र येत गेल्या तीन महिन्यापासुन न मिळालेल्या वेतनामुळे कोणीही बूथवर न जाता टोल ऑफिसमोर बसून राहिले. टोल व्यवस्थापक विवेक शर्मा यांच्याशी या कर्मचाऱ्यांनी चर्चा केली. तेव्हा त्यांनी 20 तारखेपर्यंत काम चालू ठेवा, असे सांगितले. ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय कामावर हजर होणार नाही, अशा स्थितीत ठिया मांडून टोल ऑफिससमोर कर्मचारी बसले होते. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख