मनसे का सोडली, याची कारणे जाहीर सांगू शकत नाही...

ज्यांना आवडलेले नाही ते टीका करत आहेत, ज्यांना आवडले ते त्यांच्याकडून अभिनंदन होत आहे. प्रत्येकांच्या वैयक्तिक भावनांचा विषय आहे. यापुढेचे संपूर्ण आयुष्य शिवसेनेसोबतच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Uddhav Thackeray, Aditya Thackeray's entry into the Shivsena inspired by the working method ......
Uddhav Thackeray, Aditya Thackeray's entry into the Shivsena inspired by the working method ......

सातारा : शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे व युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची कार्यपध्दती पाहून प्रेरित होऊन मी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मनसेत नेत्यांत मतभेद झाले होते, त्यानंतर विषय ताणत गेले, त्यामुळे शेवटी संयम राखत मी शिवसेना प्रवेशाचा निर्णय घेतला, असे स्पष्टीकरण आदित्य शिरोडकर यांनी आपल्या शिवसेना प्रवेशावर दिले आहे.  

मनसेला सोडचिठ्ठी देत आदित्य शिरोडकर यांनी आज शिवबंधन बांधले आहे, या पार्श्वभूमीवर त्यांनी आपली भूमिका मांडली. शिरोडकर म्हणाले, हा निर्णय घेणे मला सोपे नव्हते. पण, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे व युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची कार्यपध्दत पाहून प्रेरित होऊन मी  शिवसेनेत प्रवेश केला आहे. मनसेतील नाराजी विषय हा आठवड्यात किंवा मागील दहा पंधरा दिवसांत झालेला विषय नाही.

विधानसभेपासून नेत्यांत मतभेद झाले होते, त्यानंतर विषय ताणत गेले आणि शेवटी संयम राखत ठेऊन मी प्रवेशाचा निर्णय घेतला आहे. नेमक्या काय बिघडलं, याविषयी ते म्हणाले, काही विषय वैयक्तिक आहेत, राजकिय नाहीत. राजकारणात काही तत्वे असतात. मी त्याविषयी सर्वकाही बोललो, तर फार चुकीचे तसेच राजकिय तत्वाच्या बाहेरील होईल. त्याविषयी मला अधिक बोलता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

या प्रवेशामागील राजकिय मुल्ये काय आहेत, यावर ते म्हणाले, या निर्णयाविषयी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी बोललो नाही, पण सगळ्यांना कळत असते. कालांतरणाने हे सर्व समजून येईल. तरीही नेमके काय घडले ते सांगा, यावर श्री. शिरोडकर म्हणाले, बरेचशे विषय आहेत. २००९ ची विधानसभेची निवडणूक होती. यामध्ये सरदेसाई येथून आमदार झाले. या प्रक्रियेत माझ्यासह सगळ्या महाराष्ट्रातील सगळ्यांनी मेहनत घेतली. जिंकुन आल्यानंतर त्यांनी प्रतिसाद देणे गरजेचे होते. तसेच सर्वांना समजून घेण्याबाबत त्यांच्याकडून झालेले नही. यातूनच पुढे दरी वाढत गेली, याबाबत पुण्यात ही काही प्रकार झाले. 

आता मी शिवसेनेत प्रवेश घेतलेला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करत राहणार आहे. काम झाले की टाकून द्यायचे, असा प्रकार झाल्याने मी निर्णय घेतला. पण याविषयी मी राज ठाकरे यांच्याशी बोललो नाही तसेच यापुढेही बोलणार नाही. नेमकी कारणे कार्यकर्त्यांना माहिती असतात. मनसेत तुम्हाला डावलल्याची भावना आहे का, यावर श्री. शिरोडकर म्हणाले, मनसेत खूप संधी मिळाली. अनेक कामे केली. त्यामुळे संधी दिली गेली नाही, हा विषय नाही.

तुमच्या प्रवेशाविषयी प्रतिक्रिया उमटत आहेत, त्याविषयी काय सांगाल, ते म्हणाले, ज्यांना आवडलेले नाही ते टीका करत आहेत, ज्यांना आवडले ते त्यांच्याकडून अभिनंदन होत आहे. प्रत्येकांच्या वैयक्तिक भावनांचा विषय आहे. यापुढेचे संपूर्ण आयुष्य शिवसेनेसोबतच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मनसेची सर्व जबाबदारी आत अमित ठाकरेंवर येणार आहे, त्यांना काय सल्ला द्याल, यावर शिरोडकर म्हणाले, त्यांनी पुढाकार घ्यावा, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत.

शिवसेनेत कोणती जबाबदारी तुम्हाला मिळेल, या प्रश्नावर शिरोडकर म्हणाले, युवा सेनेत काम करणार असून कोणताही हेतू ठेऊन काम करणार नाही. माझा निर्णय हा भावनिक होता. त्यामुळे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना मी विनंती केली. त्याप्रमाणे माझा प्रवेश झालेला आहे. आता त्यांच्यासोबतराहून समाजकार्य करणार आहे. ते देतील ती जबाबदारी मी पार पाडेन. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काय प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, की, राजना विचारूनच आलाय का.

वडीलांशी चर्चा केली आहे का, त्यावर शिरोडकर म्हणाले,  त्यांच्या सहमतीने मी निर्णय घेतला आहे. सध्या त्यांचीही तब्येत ठिक नाह, त्यामुळे तब्येत बरी झाल्यावर तेही शिवसेना प्रमुखांना भेटणार आहेत. तुमचे कार्यकर्ते तुमच्यासोबत येणार का, यावर शिरोडकर म्हणाले, बऱ्याच लोकांचे फोन आले आहेत. सोबत यायची त्यांची इच्छा आहे. पण युवा सेनेचे नेते व पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून पक्ष म्हणून निर्णय घेतला जाईल. मुंबई महापालिकेच्या निवडणूका होत आहेत, यामध्ये काही महत्वाची जबाबदारी दिली जाईल काय, यावर श्री. शिरोडकर म्हणाले, निवडणूकीबाबत पक्षश्रेष्टी ठरवतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com